जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले कन्यादान

By Admin | Published: May 2, 2017 04:43 AM2017-05-02T04:43:01+5:302017-05-02T04:43:01+5:30

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर (रा. वझ्झर, जि. अमरावती) यांची मानस कन्या मंगल व योगेश (रा. रावेर) या दिव्यांग

District Collector of Jalgaon did Kanyadan | जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले कन्यादान

जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले कन्यादान

googlenewsNext

जळगाव : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर (रा. वझ्झर, जि. अमरावती) यांची मानस कन्या मंगल व योगेश (रा. रावेर) या दिव्यांग तरुणांचा विवाह सोहळा रविवारी रोटरी क्लब जळगाव वेस्टच्या पुढाकारातून व हजारो जळगावकरांच्या साक्षीने थाटात झाला. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी कन्यादान केले.
मंगल ही पापळकर यांची १९वी मानस कन्या असून, तिचा विवाह हा एक राष्ट्रीय महोत्सव म्हणून साजरा झाला. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खा. रक्षा खडसे, आनंदराव आडसूळ, अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, मनपा आयुक्त जीवन सोनवणे, शाकाहार सदाचारचे प्रणेता रतनलाल बाफना, रोटरी क्लबचे गव्हर्नर महेश मोकालकर आदी उपस्थित होते.
सकाळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री राजकुमार बडोले यांनी वधू-वरांना आशीर्वाद दिले.
संध्याकाळी विवाह सोहळ्यादरम्यान उपस्थित लोकप्रतिनिधींनी बेवारस दिव्यांगांच्या आजीवन आश्रयासाठी कायदा करण्यासाठी विधानसभा, विधान परिषद तसेच लोकसभेत पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. मुलीचे काका म्हणून माजी मंत्री सुरेशदादा जैन व महापौर नितीन लढ्ढा यांनी आंतरपाट धरला. (प्रतिनिधी)

Web Title: District Collector of Jalgaon did Kanyadan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.