जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ग्राम पंचायतींच्या विकास कामांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 12:52 AM2018-02-14T00:52:09+5:302018-02-14T00:52:37+5:30
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मंगळवारी मुलचेरा पंचायत समितीला भेट देऊन ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत समाविष्ट असलेल्या सहा ग्रामपंचायतीमधील विकास कामांचा आढावा घेतला.
ऑनलाईन लोकमत
मुलचेरा : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मंगळवारी मुलचेरा पंचायत समितीला भेट देऊन ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत समाविष्ट असलेल्या सहा ग्रामपंचायतीमधील विकास कामांचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा येमुलवार, मुलचेराचे तहसीलदार अनिरूध्द कांबळे, संवर्ग विकास अधिकारी बादलशहा मडावी यांच्यासह पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयातील निवासस्थानांची पाहणी केली. निवासस्थानांच्या बांधकामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याची बाब तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली.