जिल्हा रुग्णालयात आता ‘कँन्सर वॉरिअर्स’
By admin | Published: June 27, 2016 01:30 AM2016-06-27T01:30:01+5:302016-06-27T01:30:01+5:30
‘कॅन्सर पेडियाट्रिव्ह ट्रिटमेंट’ लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सूतोवाच राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी ‘लोकमत’च्या या प्रकाशन सोहळ्यामध्ये केले.
पुणे : शहराबाहेर असलेल्या उरो रुग्णालयाच्या जवळ इमारत स्थापन करून, ‘कॅन्सर पेडियाट्रिव्ह ट्रिटमेंट’ लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सूतोवाच राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी ‘लोकमत’च्या या प्रकाशन सोहळ्यामध्ये केले.
सावंत म्हणाले की, पुण्यात एक ब्रिटिशकालीन उरो रुग्णालय होते, संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी उरो रुग्णालय शहराबाहेर वसविण्याची संकल्पना त्या वेळी होती.
टीबीसारख्या आजारांवर तिथे उपचार केले जायचे. या उरो रुग्णालयाच्या जवळ छानशी इमारत बांधून कॅन्सर पेडियाट्रिव्ह ट्रिटमेंट लवकरच सुरू करण्यात येणार आहे. कॅन्सरची ट्रिटमेंट बऱ्याच काळ चालते, घरातल्या लोकांना कॅन्सर रुग्णांची देखभाल करावी लागते.
त्या रुग्णाला मानसिक आधार कसा द्यायचा यापासून ते त्याची काळजी कशाप्रकारे घ्यायची, याचे मार्गदर्शन करणारी आणि कॅन्सर पेडियाट्रिव्ह ट्रिटमेंट देणारी टीम तयार करण्यात येत आहे. याशिवाय प्रत्येक जिल्हा रुग्णालयात कॅन्सर रुग्णांना मदत करणारी ‘कॅन्सर वॉरिअर्स’ची संकल्पना राबविण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.