जिल्हा परिषद अध्यक्षांचा ‘एस’क्लब
By admin | Published: March 22, 2017 01:14 AM2017-03-22T01:14:24+5:302017-03-22T01:14:24+5:30
राज्यातील सहा जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या नावाची सुरुवातही ‘एस’ अक्षराने
यशोवर्धन मोरे/ कोल्हापूर
राज्यातील २५ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड मंगळवारी मोठ्या उत्साहात झाली. या निवडीत प्रत्येक ठिकाणी युती-आघाडीची नवनवीन खिचडी शिजली असली तरी एक गोष्ट मात्र काही ठिकाणी समान असल्याचे दिसून आले. आज निवडलेल्या गेलेल्या २५ पैकी १० ठिकाणच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षांच्या नावाची सुरुवात इंग्रजी अक्षर ‘एस’ आद्याक्षराने होत आहे. हा एक योगायोग म्हणावा लागेल.कोल्हापुरात शौमिका महाडिक, सांगलीत संग्रामसिंह देशमुख, साताऱ्यात संजीवराजे नाईक-निंबाळकर , सोलापुरात संजय शिंदे, रत्नागिरीत स्नेहा सावंत, नांदेडमध्ये शांताबाई पवार, अहमदनगरमध्ये शालिनी विखे-पाटील, नाशिकमध्ये शीतल सांगळे, हिंगोलीमध्ये शिवराणी नरवाडे, बीडमध्ये सविता गोल्हार यांचा समावेश आहे. हे सर्वजण एस क्लबमधीलच आहेत. विशेष म्हणजे, राज्यातील सहा जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या नावाची सुरुवातही ‘एस’ अक्षराने होत आहे. यामध्ये सर्जेराव पाटील (कोल्हापूर), सुहास बाबर (सांगली), संतोष थेराडे (रत्नागिरी), शिवानंद पाटील (सोलापूर), सतीश टोपे (जालना), समाधान जाधव (नांदेड) यांचा समावेश आहे.