जिल्ह्यात ६५१ विक्रमी अर्ज दाखल

By admin | Published: February 6, 2017 11:46 PM2017-02-06T23:46:22+5:302017-02-06T23:46:22+5:30

जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी २२८ : पं. स.च्या १०० जागांसाठी ४२३ जणांची उमेदवारी

District's 651 record for filing nominations | जिल्ह्यात ६५१ विक्रमी अर्ज दाखल

जिल्ह्यात ६५१ विक्रमी अर्ज दाखल

Next

जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी २२८ : पं. स.च्या १०० जागांसाठी ४२३ जणांची उमेदवारी
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद व पंचायत समित निवडणुकांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची सहाव्या व शेवटच्या दिवशी अनुक्रमे १७९ व ३४५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या ५० जागांसाठी २२८ उमेदवारांनी नामनिर्देशन तर पंचायत समित्यांच्या १०० जागांसाठी ४२३ उमेदवाराांक्ष नामनिर्देशन दाखल केले आहेत. त्यामुळे एकूण दाखल अर्जांची संख्या ६५१ झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १३ फेब्रुवारी रोजी असून यावेळी किती उमेदवार निवडणूक लढविणार हे निश्चित होणार आहे. इच्छुकांना पक्षांकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या उमेदवारांनी बंडखोरी केल्याने नेत्यांची आज डोकेदुखी वाढली आहे.
२१ फेब्रुवारी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी मतदान होत आहे. कोणत्याही राजकीय पक्षांनी

१२५८ उमेदवारांनी केली होती आॅनलाईन नोंदणी
जि. प. व प. स.साठी इच्छुक १२५८ उमेदवारांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. यात जिल्हा परिषदेसाठी ४८२ तर पंचायत समितीसाठी ७७६ उमेदवारांनी नोंदणी केली होती.
यात जि. प.साठी ४८२ तर पं. स.साठी ७७६ उमेदवारांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात मात्र ६५१ उमेदवारांनी ६ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल केले आहेत.


सोमवारी दाखल झालेले अर्ज
सोमवारी वैभववाडी तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी १२ तर पंचायत समितीसाठी २0 अर्ज दाखल झाले. कणकवली तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी २५ तर पंचायत समितीसाठी ४५ अर्ज दाखल झाले. मालवण तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी २३ तर पंचायत समितीसाठी ४९ अर्ज दाखल झाले. सावंतवाडी तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी ३१ तर पंचायत समितीसाठी ६३ अर्ज दाखल झाले. दोडामार्ग तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी १0 तर पंचायत समितीसाठी २६ अर्ज दाखल झाले. देवगड तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी १२ तर पंचायत समितीसाठी २७ अर्ज दाखल झाले. कुडाळ तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी ४१ तर पंचायत समितीसाठी ६७ अर्ज दाखल झाले आहेत. वेंगुर्ले तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी २५ तर पंचायत समितीसाठी ५४ अर्ज दाखल झाले आहेत.
१३ मे रोजी चित्र स्पष्ट होणार
जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी २२८ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहे. तर पंचायत समित्यांच्या १०० जागांसाठी ४२३ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली ैआहेत. असे असले तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १३ फेब्रुवारी आहे. त्यामुळे कीती उमेदवार निवडणूक रिंंगणातून माघार घेणार व किती उमेदवार निवडणूक लढविणार हे चित्र १३ रोजीच स्पष्ट होणार आहे.

Web Title: District's 651 record for filing nominations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.