Coronavirus lockdown कोरोना आटोक्यात आलेल्या जिल्ह्यांना अखेर मिळणार दिलासा. लॉकडाऊन मात्र कायम :आरोग्यमंत्री राजेश टोपे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 11:51 AM2021-05-28T11:51:06+5:302021-05-28T11:53:00+5:30
पुण्याला मिळणार का दिलासा? आज निर्णय
पॅाझिटिव्हिटी रेट जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहे तर इतर सर्व ठिकाणी काही प्रमाणात शिथिलता मिळू शकते असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. लॅाकडाउन मात्र कायम राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
पुण्यामध्ये आज टोपे यांनी साखर संकुलात कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळेस बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
राज्यात १२ जिल्ह्यांमध्ये मृत्यू चे प्रमाण चिंताजनक आहे. तसेच १५ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बुलढाणा, अकोला, यवतमाळ वाशिम असे १५ जिल्हे रेड झोन मध्ये आहेत. या भागांमध्ये कडक लॅाकडाउन कायम राहणार आहे. तर जिथे कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे तिथे काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले जातील.
“ज्या जिल्ह्यांमध्येे पॉजिटिव्ही रेट अजूनही जास्त आहे त्या ठिकाणी आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढणार हे जवळपास निश्चित आहे तर जिथं कोरोनाची साथ आटोक्यात आलीय तिथंही फार तर काही प्रमाणात शिथिलता मिळू शकते पण संपूर्ण लॉकडाऊन उठवण्याचा प्रश्नच येत नाही” असे आरोग्य मंञी राजेश टोपे म्हणाले आहेत.
या दिलासा मिळणाऱ्या शहरांमध्ये पुण्याचा समावेश होणार का हे पहावे लागेल.