तीन आठवड्यांत विहीर खोदून टंचाईवर मात !

By admin | Published: September 8, 2015 05:27 AM2015-09-08T05:27:23+5:302015-09-08T05:27:23+5:30

अख्खा मराठवाडा दुष्काळाच्या झळा सोसत असताना बीड तालुक्यातील बाभूळवाडीने केवळ तीन आठवड्यांत विहीर खोदून गावच्या डोक्यावरचा हंडा कायमचा उतरविला. सरकारी पैशांची वाट न

Ditch the well in three weeks to overcome the scarcity! | तीन आठवड्यांत विहीर खोदून टंचाईवर मात !

तीन आठवड्यांत विहीर खोदून टंचाईवर मात !

Next

- संजय तिपाले,  बीड
अख्खा मराठवाडा दुष्काळाच्या झळा सोसत असताना बीड तालुक्यातील बाभूळवाडीने केवळ तीन आठवड्यांत विहीर खोदून गावच्या डोक्यावरचा हंडा कायमचा उतरविला. सरकारी पैशांची वाट न पाहता सरपंचांनी स्वत:चे १० लाख ओतले. अवघ्या ४० फुटांवर विहिरीला पाणी लागल्याने पाण्यासाठी गावकऱ्यांची रानोमाळ भटकंती थांबली आहे.
बाभूळवाडी (ता.बीड) या ग्रामपंचायती अंतर्गत बेडूकवाडी, बेलवाडी ही दोन गावे येतात. यापैकी बेडूकवाडी हे साधारण तेराशे लोकसंख्येचे गाव. गावच्या डोक्यावर कायम घागर. पाऊस कितीही झाला तरी दरवर्षी टँकर ठरलेला. यंदा तर मी मी म्हणणाऱ्या गावानेही पाणीटंचाईच्या झळा सोसल्या. त्यामुळे बेडूकवाडीकरांच्या डोक्यावर भर पावसाळ्यात घागर दिसू लागली. जुन्या योजेनतील विहीर कोरडीठाक पडल्याने पाणीप्रश्न ऐरणीवर आला. गावातील तीन हातपंपांना पाणी यायचे. तेही कोरडेठाक पडले. माणसांनाच पाणी मिळणे कठीण झाले. जनावरांचे तर हाल विचारायलाच नको. पाण्यासाठी गावकऱ्यांची रानोमाळ भटकंती सुरू झाली. सरपंच परमेश्वर सातपुते यांनी बेडूकवाडीसाठी नरेगातून विहीर मंजूर करून आणली. तहान लागल्यावर विहीर खोण्याचा प्रकार म्हणून हिणवले जाऊ लागले.
काम पूर्ण कधी व्हायचे अन् गावाला पाणी कधी मिळायचे, असे प्रश्न उपस्थित झाले; परंतु सातपुते खचले नाहीत.
तांत्रिक अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने
मनकर्णिका तलावात स्थळ निश्चित करून आॅगस्ट महिन्यात विहिरीचे खोदकाम सुरू झाले. शासन निधीची प्रतीक्षा न करता सातपुते यांनी पदरचे १० लाख रुपये खर्च केले. २१व्या दिवशी विहिरीला ४० फुटांवर पाणी लागले.

विहिरीमुळे कायमचा प्रश्न मार्गी लागला. टँकरवर होणारा खर्च तर वाचलाच; पण गावकऱ्यांचाही त्रास वाचला.
- परमेश्वर सातपुते,
सरपंच, बाभूळवाडी.

Web Title: Ditch the well in three weeks to overcome the scarcity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.