दिवे घाटाचे अवघड वळण पार!

By admin | Published: July 13, 2015 12:58 AM2015-07-13T00:58:18+5:302015-07-13T00:58:18+5:30

चपापतं ऊन अन् अवघड दिवे घाट पार करत संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी संध्याकाळी सासवडमध्ये दाखल झाली. वारकऱ्यांच्या समस्येवर

Dive defines the difficult turn of the deficit! | दिवे घाटाचे अवघड वळण पार!

दिवे घाटाचे अवघड वळण पार!

Next

सासवड : चपापतं ऊन अन् अवघड दिवे घाट पार करत संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी संध्याकाळी सासवडमध्ये दाखल झाली. वारकऱ्यांच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी सोमवारी पालखी तळावर दिंडी समाजाची बैठक होणार आहे.
एकादशी असल्याने उपाशीपोटी हरिनामाचा जयघोष करीत असताना निसर्ग रविवारी वारकऱ्यांची परीक्षाच पाहत होता. शिंदे छत्री, हडपसर, उरळी देवाची अशी वाटचाल करीत सोहळ्याने दिवे घाटाच्या पायथ्याशी दोन तास विश्रांती घेतली आणि घाट चढण्यास प्रारंभ केला.
नाम विठोबाचे घ्यावे। मग पाऊल टाकावे।। या अभंगाप्रमाणे अवघड घाटाचे आव्हान पेलण्यासाठी नामाचे बळ वारकऱ्यांमध्ये संचारते. चढणीचा रस्ता आणि तळपते ऊन यामुळे वारकरी घामाघूम झाले. तरीही दोन तासांत हा घाट पार करून पालखी झेंडेवाडी येथे विसाव्याला आली.

Web Title: Dive defines the difficult turn of the deficit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.