वैविध्यपूर्ण सांस्कृतिक मेजवानी

By admin | Published: February 17, 2016 03:17 AM2016-02-17T03:17:12+5:302016-02-17T03:17:12+5:30

देशाच्या सांस्कृतिक वैविध्यतेची झलक मेक इन इंडिया सेंटरवर अनुभवायला मिळत आहे. विविध राज्यांतील सांस्कृतिक आविष्कार एकाच व्यासपीठावर

Diverse cultural party | वैविध्यपूर्ण सांस्कृतिक मेजवानी

वैविध्यपूर्ण सांस्कृतिक मेजवानी

Next

मुंबई : देशाच्या सांस्कृतिक वैविध्यतेची झलक मेक इन इंडिया सेंटरवर अनुभवायला मिळत आहे. विविध राज्यांतील सांस्कृतिक आविष्कार एकाच व्यासपीठावर पाहायला मिळत असल्याने नागरिकही या कार्यक्रमांसाठी मोठी गर्दी करत आहेत.
काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, केरळ, मिझोरम, सिक्कीम आणि मणिपूरची पथके मेक इन इंडिया सेंटरवर आपली कला सादर करीत आहेत. काश्मिरातील युवक-युवतींचा गट पारंपरिक नृत्य सादर करीत आहे.
तर, विवाह आणि अन्य शुभप्रसंगी
केले जाणारे मणिपुरचे पुंगचेलम
नृत्य, मध्य प्रदेशचे बधाई नृत्य,
गुजराती होळी व आदिवासी नृत्य आणि मिझोरामच्या बांबू नृत्यामुळे मेक इन इंडियाच्या कॉर्पोरेट वातावरणात ‘पारंपरिक सूर’ मिसळले आहेत.
सिक्कीम पथकाचे सिंगीचम हे नृत्य आणि युद्धप्रकार आपले वेगळेपण राखून आहे. वाघाचा मुखवटा आणि झूल अंगावर पांघरलेले कलाकार विविध कसरती करतात. पंजाब, मणिपूर आणि केरळच्या पथकांनी शारीरीक कसरती आणि युद्धप्रकार सादर केले. पंजाबी पथकातील पैलवान पोलादी सळई वाकविणे, गळ्यावरील लोखंडी सळईने अन्य पैलवानाचे वजन पैलणे आदी चित्तथराररक कसरती करतात.
प्रत्येक पथकाभोवती प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. प्रत्येकजण हा नृत्याविष्कार आपल्या मोबाइलमध्ये टिपण्याची धडपड करतो. तर, अनेक जण या कलाकारांसोबत सेल्फी काढण्याची हौस भागवून घेतात.

Web Title: Diverse cultural party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.