लिपींमधील वैविध्य ही लिपीरहित भाषांची खरी समस्या

By Admin | Published: February 28, 2017 02:27 AM2017-02-28T02:27:36+5:302017-02-28T02:27:36+5:30

विविध लिपींच्या जास्तीत जास्त वापरामुळे लिपीरहित भाषांचे साहित्यिक स्थान अधिक खालावत चालले असल्याची भावना साहित्यिकांनी व्यक्त केली.

The diversity of script is the true problem of non-scriptered languages | लिपींमधील वैविध्य ही लिपीरहित भाषांची खरी समस्या

लिपींमधील वैविध्य ही लिपीरहित भाषांची खरी समस्या

googlenewsNext


मुंबई : विविध लिपींच्या जास्तीत जास्त वापरामुळे लिपीरहित भाषांचे साहित्यिक स्थान अधिक खालावत चालले असल्याची भावना साहित्यिकांनी व्यक्त केली. सोमवारी एलआयसी लिटफेस्टचे तिसरे सत्र संपन्न होत असताना, भारतीय भाषांमधील साहित्य व वाङ्मयाला लिपींच्या लक्ष्मणरेषेने दुभाजू नये, असेही मत या वेळी साहित्यिकांनी व्यक्त केले. जाती व धर्म भिन्न असले, तरीही माणुसकी आणि वाङ्मय मात्र एकसंधच आहे, यावर सर्व सहभागी साहित्यिकांचे एकमत झाले. भाषा, विशेषत: पारंपरिक बोलीभाषा हा संस्कृतींशी जोडणारा समान धागा असून, या बोलीभाषांचे जतन करणे सर्वांत महत्त्वाचे आहे.
दोन दिवस रंगलेल्या या साहित्यिक मेळाव्यात भारतीय प्रादेशिक भाषांतील प्रसिद्ध व नवोदित लेखक-साहित्यिकांची मांदियाळी जमली होती. ‘भारतीय साहित्याचा आधुनिक चेहरा’ या विषयावरील चर्चासत्रात सर्व साहित्यिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. कोकणीसारख्या बोलीभाषांच्या लिपीची रचना ही खरी समस्या नसून, लिपींमधील वैविध्य व त्यांचा प्रचंड मोठा समुदाय, ज्यामुळे प्रत्येक लिपीची स्वतंत्र ओळखच पुसली जाते. ही खरी समस्या बनली असल्याचे मत, ‘लिपीरहित भाषा - इतर भाषांच्या लिपी वापरणाऱ्या भाषांपुढील आव्हाने’ या चर्चासत्रात विविध भाषिक लेखकांनी व्यक्त केले. या सत्राचे अध्यक्षपद भूषवणारे खासी लेखक डेसमंड खमार्वाफ्लांग म्हणाले, इतर भाषांच्या लिपी वापरताना त्या भाषा हाताळण्याचे कामच फार जिकिरीचे होऊन जाते.
आसाम आणि मेघालय येथे बहुसंख्य लोकांच्या रोजच्या वापरातील खासी या भाषेची लिपी मात्र, फारच दुर्मीळ आहे. बऱ्याच कालावधीसाठी ही भाषाच मुळापासून लुप्त झाली होती. वेल्श मिशनरींनी १८४१ मध्ये रोमन लिपीमध्ये ही भाषा लिहीण्याचा प्रयत्न करून, तिला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयास केला. हा सराव आजपर्यंत सुरू राहिल्यामुळे ही भाषा आजही जिवंत आहे.
भोजपुरी ही आधुनिक भाषा आहे, या मुद्द्याकडे लक्ष वेधून घेताना, भोजपुरी लेखक परिचय दास यांनी सांगितले की, भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नसून, तिच्याशी असंख्य व्यक्तिगत आठवणी जोडल्या गेलेल्या असतात. ज्या भाषेत आपण आयुष्यभर काम करतो, त्या भाषेचे आपल्या व्यक्तिमत्त्वावरही काहीतरी ऋण असतात. विकिपीडियाच्या आकड्यांनुसार, भारतात १० लाखांहून अधिक लोक भोजपुरी या भाषेचा वापर दैनंदिन व्यवहारांसाठी करतात. कैथी ही भोजपुरी भाषेची मूळ लिपी असून, तिचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)
>तज्ज्ञांच्या मते़़़
अहिराणी भाषेचे महत्त्व सांगताना, प्रसिद्ध अहिराणी लेखक रमेश सूर्यवंशी यांनी सांगितले, संत ज्ञानेश्वरांच्या पवित्र ज्ञानेश्वरीमध्ये अहिराणी भाषेचा वापर केला गेला आहे. ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात मौर्य व वाकाटाका यांच्या साम्राज्यात या भाषेचा जन्म झाला. महाराष्ट्रातील जळगाव व धुळे भागात दीड कोटी लोक अहिराणी भाषा बोलतात. मराठी भाषेची गणना जर जगातील सर्वांत श्रीमंत भाषांमध्ये करायची असेल, तर अहिराणीसारख्या मराठीच्या बोलीभाषांनाच त्याचे जास्तीत जास्त श्रेय जाते. मराठी भाषेची परंपराच तिच्या बोलीभाषांमध्ये वसलेली आहे. कोसली ही ओरिसा राज्यातील पुरातन बोलीभाषा आहे. रामायण, महाभारत, भागवत यांसारखी पुरातन महाकाव्ये कोसली भाषेत लिहिली गेली आहेत. कोसली भाषेतील साहित्याला मर्यादा घालत, त्यांतील साहित्याचे इतर भाषांमध्ये रूपांतर फारच कमी प्रमाणात केले गेले आहे. भारतीय घटनेत कोसली भाषेचा आठव्या क्रमांकावर अंतर्भाव करण्यात यावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री राजनाथ सिंह यांना लेखी अर्ज केला आहे, असे प्रसिद्ध कोसली कवी पद्मश्री हलधर नाग म्हणाले.

Web Title: The diversity of script is the true problem of non-scriptered languages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.