स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट
By admin | Published: September 21, 2014 02:00 AM2014-09-21T02:00:57+5:302014-09-21T02:00:57+5:30
महायुतीशी जागावाटपाबाबत चर्चा सुरू असतानाच राज्य प्रवक्ते महेश खराडे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बी. जी. पाटील यांनी शनिवारी बंडखोरीचा निर्णय जाहीर केला.
Next
सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महायुतीशी जागावाटपाबाबत चर्चा सुरू असतानाच राज्य प्रवक्ते महेश खराडे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बी. जी. पाटील यांनी शनिवारी बंडखोरीचा निर्णय जाहीर केला.
‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांची भाजपा-शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी जागांबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, तेथून ‘स्वाभिमानी’कडून महेश खराडे इच्छुक आहेत. घोरपडे यांच्या हालचालींमुळे ते अस्वस्थ असून, त्यांनी बंडखोरी जाहीर करून संपर्क, गाठीभेटी सुरू केल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)