शिवसेनेमुळेच हिंदुत्ववादी मतांचे विभाजन
By admin | Published: November 11, 2014 02:41 AM2014-11-11T02:41:16+5:302014-11-11T02:41:16+5:30
शहा यांचे हे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर पडले तेव्हाच शिवसेना संपवण्याची भाषा करणा:यांबरोबर यापुढे युती टिकवायची नाही, अशी भूमिका घेतली होती,
Next
अमित शहा यांच्या याच विधानाने युतीत बिब्बा
संदीप प्रधान - मुंबई
शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षांमधील जागावाटपाचा तिढा सुटत नव्हता तेव्हा हिंदुत्ववादी विचारांकरिता हा तिढा सोडवण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना साकडे घालणा:यांकडे ‘शिवसेना असल्यानेच हिंदुत्ववादी मतांचे विभाजन झाले आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली होती. शहा यांचे हे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर पडले तेव्हाच शिवसेना संपवण्याची भाषा करणा:यांबरोबर यापुढे युती टिकवायची नाही, अशी भूमिका घेतली होती, असे समजते.
शिवसेना संपवल्याखेरीज हिंदुत्ववादी मतांचे विभाजन थांबणार नाही ही
शहा यांची भूमिका असल्याने जागावाटपाच्या तिढय़ाच्या वेळी आणि आता महाराष्ट्रात मंत्रिपदे देताना शिवसेनेला झुलवत ठेवण्याचा प्रकार भाजपाकडून सुरू होता, असे शिवसेनेतील सूत्रंनी सांगितले. तसेच शिवसेनेकडून या नेत्यांशी चर्चा करणारे तेच तेच पुन:पुन्हा सांगून दमतील, कंटाळतील असा चोख बंदोबस्त भाजपाने केला होता.
कोंडी करण्याची रणनीती
शिवसेना हा हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष संपवणो हेच जर शहा यांचे कारस्थान असेल तर त्यांना त्याच हिंदुत्वाच्या भूमिकेवर कोंडीत पकडण्याची शिवसेनेची रणनीती आहे. त्यामुळेच शरद पवार यांनी केलेल्या ‘भगव्या दहशतवादा’च्या टीकेचा नैतिक पेच शिवसेनेने हेतूत: भाजपासमोर उभा केला आहे. हिंदुत्वाच्या मुद्दय़ापासून चार हात अंतर राखून असलेल्या भाजपाला आता हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरून आखाडय़ात खेचण्याचे शिवसेनेचे मनसुबे आहेत.