Family Court News: घटस्फोटापूर्वीत पत्नीने मेट्रोमोनियल साईटवर टाकली प्रोफाईल, लिहिलं असं काही..., मग कोर्टाने दिला असा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 10:19 AM2021-08-29T10:19:19+5:302021-08-29T10:19:32+5:30

Family Court News: सदर महिलेने घटस्फोटावर कौटुंबिक कोर्टात सुनावणी सुरू असतानाच दोन मेट्रोमोनियल वेबसाईटवर दुसऱ्या विवाहासाठी प्रोफाईल अपलोड केली होती.

Before the divorce, the wife posted a profile on the metromonial site, then the court grants divorce | Family Court News: घटस्फोटापूर्वीत पत्नीने मेट्रोमोनियल साईटवर टाकली प्रोफाईल, लिहिलं असं काही..., मग कोर्टाने दिला असा निकाल

Family Court News: घटस्फोटापूर्वीत पत्नीने मेट्रोमोनियल साईटवर टाकली प्रोफाईल, लिहिलं असं काही..., मग कोर्टाने दिला असा निकाल

googlenewsNext

नागपूर - मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने घटस्फोटाच्या प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल देताना एका तरुणाला त्याच्या पत्नीपासून घटस्फोट मंजूर केला आहे. (Family Court News) या तरुणाच्या पत्नीने घटस्फोटावर कौटुंबिक कोर्टात सुनावणी सुरू असतानाच दोन मेट्रोमोनियल वेबसाईटवर दुसऱ्या विवाहासाठी प्रोफाईल अपलोड केली होती. दरम्यान, या प्रोफाईलमध्ये महिलेने घटस्फोटाच्या निर्णयाची प्रतीक्षा असा उल्लेख केला. (Before the divorce, the wife posted a profile on the metromonial site,  then the court grants divorce)

या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्ती ए.एस. चंदूरकर आणि जी.ए. स्नॅप यांच्या खंडपीठाने आपल्या निर्णयामध्ये सांगितले की, मेट्रोमोनियल वेबसाईटवर प्रोफाईल अपलोड करण्याचा स्पष्ट अर्थ होतो की या महिलेने पतीपासून घटस्फोट घेण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर तिने कुटुंबाने ठरवण्यापूर्वीच दुसरा विवाहही निश्चित केला आहे. न्यायालाने सांगितले की, प्रतिवादीने (पत्नी) मेट्रोमोनियल वेबसाईटवर फोटो अपलोड करून आपण घटस्फोटाच्या निर्णयाप्रत आले आहे, हे स्पष्ट केले आहे. सध्याच्या कागदपत्रांवरून असे दिसते की या महिलेला पतीपासून मुक्त होऊन दुसरे लग्न करायचे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या जोडप्याचा विवाह २०१४ मध्ये झाला होता. विवाहानंतर दोघेही पणजीला राहायला गेले. मात्र काही दिवसांतच या महिलेने पणजीमध्ये तिला करमत नसल्याची तक्रार सुरू केली. तिने पतीकडे नोकरी सोडून अकोला येथे शिफ्ट होण्याचा तगादा लावला. दरम्यान, पतीने पत्नीचे हे म्हणणे ऐकले नाही. त्यामुळे दोघांमध्ये मतभेदनिरमाण झाले. लग्नाच्या नऊ महिन्यांनंतर पत्नीने एका परीक्षेच्या निमित्ताने पणजी सोडली. तसेच आपले सर्व वैयक्तिक सामान स्वत:कडे ठेवले. त्यानंतर पतीला नाईलाजास्तव कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज करावा लागला.

या प्रकरणी सुनावणी करताना कौटुंबिक न्यायालयाने ७ डिसेंबर २०२० रोजी पतीची घटस्फोटासाठीची याचिका फेटाळून लावली. मात्र त्यांना कायदेशीररीत्या वेगळे राहण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर पतीने घटस्फोटासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर त्यांचा घटस्फोत शुक्रवारी मंजुर करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणातील महिलेने सासरच्यांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला. मात्र कोर्टाने या महिलेच्या दाव्यावर अविश्वास व्यक्त केला.  

Web Title: Before the divorce, the wife posted a profile on the metromonial site, then the court grants divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.