सासवडला रंगली दिवाळी पहाट

By Admin | Published: November 2, 2016 01:15 AM2016-11-02T01:15:59+5:302016-11-02T01:15:59+5:30

फिटे अंधाराचे जाळे, देवाची ये द्वारी, दिल दिवाना ते सैराटपर्यंतच्या विविध गीतांचे सादरीकरण करून सोमवारी (दि. ३१) भल्या पहाटे सासवडचा कऱ्हाकाठ न्हाऊन निघाला.

Diwali dawn to saaswad | सासवडला रंगली दिवाळी पहाट

सासवडला रंगली दिवाळी पहाट

googlenewsNext


सासवड : पल पल दिलके पास, शुक्रतारा, फिटे अंधाराचे जाळे, देवाची ये द्वारी, दिल दिवाना ते सैराटपर्यंतच्या विविध गीतांचे सादरीकरण करून सोमवारी (दि. ३१) भल्या पहाटे सासवडचा कऱ्हाकाठ न्हाऊन निघाला. निमित्त होते सासवड शहर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे. या वेळी पुण्यातील प्रथितयश गायिका आरती दीक्षित, शेखर महामुनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल तीन तास सादर केलेल्या मराठी, हिंदी चित्रपटांतील सुरेल गाण्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनातील आ. अत्रेंच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. मध्यतरात राज्यमंत्री विजय शिवतारे, नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, विजयराव कोलते, देविदास कामथे यांनी समयोचित मनोगते व्यक्त करत उपक्रमाला व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
डेक्कन बँकेचे संचालक दयानंद फडतरे यांच्यासह देविदास कामथे, नारायण जाधव यांचा सत्कार करण्यात आला. पुरंदरमध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम कारणाऱ्या सुनील कामथे, पांडुरंग सोनवणे, सासवडचे मुख्याधिकारी विनोद जळक, डॉ. विकास खैरे, रवींद्र नवलाखा आणि शिवाजी एक्के या मंडळींचा विशेष गौरव करण्यात आला.
या वेळी माजी नगराध्यक्ष हेमंत भोंगळे, प्रमोद जगताप, कला फडतरे, विद्यमान नगरसेवक अजित जगताप, वामनराव जगताप, डॉ. राजेश दळवी तसेच ख्वाजाभाई बागवान, अरुणआप्पा जगताप, अण्णा खाडे यांसह विविध क्षेत्रांतील पुरंदमधील कलारसिक, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार संघाचे सुधीर गुरव यांनी प्रास्ताविक केले, हेमंत ताकवले यांनी कार्यक्रमाचे तर स्वानंद लोमटे यांनी पुरस्कारांचे सूत्रसंचलन केले. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते यांनीही एक हिंदी गीत सादर करून कार्यक्रमाची उंची वाढवली.
या वेळी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, श्रीकृष्ण नेवसे, जीवन कड, प्रदीप जगताप, तानाजी सातव, शकील बागवान, शिवाजी कोलते, जगदीश शिंदे आदींनी उत्तम संयोजन केले. ‘ए मेरे वतन के लोगो’ या देशभक्तिपर गीताने या दिवाळी पहाट कार्यक्रमाची सांगता झाली.
>सदाबहार गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध
सासवड शहर पत्रकार संघाच्या वतीने गेली ११ वर्षे हा उपक्रम सुरू आहे. यावर्षी आरती दीक्षित प्रस्तुत नक्षत्रांचे गाणे या कार्यक्रमांतर्गत गायिका आरती दीक्षित, गायक शेखर महामुनी व अरविंद पिंगळे यांनी अनेक जुनी-नवी हिंदी व मराठी गीते सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. विजय खंडागळे, अरुण देशपांडे व राजेश देहाडे यांच्या वाद्यवृंदाने आणि कलीम पटेल यांच्या निवेदन शैलीने या कार्यक्रमाची रंगत वाढवली.

Web Title: Diwali dawn to saaswad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.