एसटी कर्मचाऱ्यांना संपामुळे दिवाळी भेट! शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळेल २८ टक्के महागाई भत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 07:18 AM2021-10-29T07:18:23+5:302021-10-29T07:19:08+5:30

ST bus employees : कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची दखल घेऊन परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी गुरुवारी कृतीसमितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली.

Diwali gift to ST employees due to strike! Like government employees, they will get 28% dearness allowance | एसटी कर्मचाऱ्यांना संपामुळे दिवाळी भेट! शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळेल २८ टक्के महागाई भत्ता

एसटी कर्मचाऱ्यांना संपामुळे दिवाळी भेट! शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळेल २८ टक्के महागाई भत्ता

Next

मुंबई : एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. मागण्या मान्य झाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीने उपोषण मागे घेतले.

कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची दखल घेऊन परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी गुरुवारी कृतीसमितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी मंदार पोहरे, कर्मचारी व औद्योगिक संबंध महाव्यवस्थापक माधव काळे, वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक सुहास जाधव, मुख्य कामगार अधिकारी राजेश कोनवडेकर आदी उपस्थित होते. 

या बैठकीत मंत्री ॲड. अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचे त्यांनी जाहीर केले.महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे संदीप शिंदे, आणि हनुमंत ताटे यांच्याबरोबरच महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे (इंटक) मुकेश तिगोटे, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे हिरेन रेडकर, कास्ट्राईब रा. प. कर्मचारी संघटनेचे सुनील निरभवणे, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे श्रीरंग बरगे, महाएसटी कामगार काँग्रेसचे (इंटक) दादाराव डोंगरे या कामगार नेत्यांचा समावेश होता.

१९० आगार पूर्ण बंद
एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी अधिक प्रतिसाद मिळाला. राज्यातील २५० आगारांपैकी १९० आगार पूर्णतः बंद होते. संघटनांच्या कृती समितीच्या उपोषणाचा दैनंदिन प्रवासी फेऱ्यांवर परिणाम झाला होता.

एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ २ टक्क्यांवरून ३ टक्के करण्याची मागणी करण्यात आली होती. या वेतनवाढीसंदर्भात दिवाळीनंतर याबाबत बैठक घेण्यात येईल.     - ॲड. अनिल परब, परिवहनमंत्री 

Read in English

Web Title: Diwali gift to ST employees due to strike! Like government employees, they will get 28% dearness allowance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.