उल्हासनगरातील बालगृहातील अपंग व मुखबधिर मुलांची दिवाळी गोड
By सदानंद नाईक | Published: October 22, 2022 07:30 PM2022-10-22T19:30:22+5:302022-10-22T19:30:46+5:30
शहरातील शासकीय बालगृहातील दिव्यांग मुला सोबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी दिवाळी साजरी केली
शहरातील शासकीय बालगृहातील दिव्यांग मुला सोबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी दिवाळी साजरी केली, मुलांना नवीन कपडे व गोडधोड देऊन त्यांच्यात गोडवा निर्माण केला.
उल्हासनगर मनसेचे उपशहर अध्यक्ष शैलेश पांडव, शहर संघटक मैनुद्दीन शेख यांच्य संकल्पेनेतून शासकीय बालगृहातील दिव्यांग मुलांची दिवाळी गोड करण्यात आली. मनसेचे जिल्हा अध्यक्ष सचिन कदम, उपजिल्हा अध्यक्ष प्रदीप गोडसे यांचेही सहकार्य लाभल्याची माहिती शेख यांनी दिली. शासकीय अपंग मुलांना नवीन कपडे देऊन दिवाळीचे फराळ दिले. असाच उपक्रम दरवर्षी पक्षाच्या वतीने राबविले जाते. अशी माहिती यावेळी शेख यांनी दिली. मुलां सोबत दिवाळी साजरी केल्याने, त्यांचा आनंद द्विगुणित होऊन चेहऱ्यावरील आनंद हेच आमचे समाधान असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
यावेळी जिल्हा अध्यक्ष सचिन कदम, उपजिल्हा अध्यक्ष प्रदीप गोडसे, शहर संघटक मैनुद्दीन शेख, उपशहर अध्यक्ष शैलेश पांडव, मनविसेचे शहर अध्यक्ष वैभव कुलकर्णी, उल्हासनगर माथाडी सेनेचे सरचिटणीस संजय नार्वेकर, विभाग अध्यक्ष बादशहा शेख, उपविभाग अध्यक्ष विष्णू जाधव तसेच मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.