दिवाळीत रेल्वेगाड्या फुल्ल
By admin | Published: October 16, 2016 08:16 PM2016-10-16T20:16:33+5:302016-10-16T20:16:33+5:30
दिवाळीला १५ दिवस शिल्लक असताना दिवाळीच्या काळातील सर्व रेल्वेगाड्यातील आरक्षण फुल्ल झाले आहे. सर्वच रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादी (वेटिंग) ४०० च्या आसपास पोहोचली
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 16 - दिवाळीला १५ दिवस शिल्लक असताना दिवाळीच्या काळातील सर्व रेल्वेगाड्यातील आरक्षण फुल्ल झाले आहे. सर्वच रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादी (वेटिंग) ४०० च्या आसपास पोहोचली आहे. तर काही गाड्यांचे तिकीटच मिळणे बंद झाले (रिग्रेट) आहे. त्यामुळे या काळात रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी अतिरिक्त रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. दिवाळीच्या काळातील रेल्वेगाड्या फुल्ल झाल्यामुळे याचा फायदा घेत दलाल सक्रिय झाले असून रविवारी रेल्वे सुरक्षा दलाने एका दलालास रंगेहाथ अटक केली आहे.
दिवाळीनिमित्त अनेकजण आपल्या कुटुंबीयांसोबत हा सण साजरा करण्याला प्राधान्य देतात. यामुळे या काळात खासगी ट्रॅव्हल्सचे दर गगनाला भिडतात. प्रवासाचे सर्वात स्वस्त आणि फायदेशीर माध्यम म्हणून असंख्य प्रवासी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देतात. प्रवाशांच्या या मानसिकतेचा फायदा घेऊन दिवाळीतील सर्व आरक्षित तिकिटांवर दलालांनी ताबा मिळविल्याची स्थिती आहे. दिवाळीच्या काळात नागपुरातून मुंबई, पुणे, दिल्ली आणि बहुतांश शहरात जाणाºया सर्वच रेल्वेगाड्यांचे ‘वेटिंग’ वाढले आहे. नियमित गाड्या फुल्ल झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने महत्त्वाच्या मार्गांवर अतिरिक्त रेल्वेगाड्यांची घोषणा करून प्रवाशांना दिलासा दिला आहे. रेल्वे प्रशासनातर्फे सोडण्यात येणाºया अतिरिक्त रेल्वेगाड्या पुढीलप्रमाणे आहेत.
नागपूरमार्गे मुंबई-हटिया-मुंबई
दिवाळी आणि दुर्गापूजेसाठी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने मुंबई-हटिया-मुंबई साप्ताहिक सुपरफास्ट पूजा स्पेशल रेल्वेगाडीच्या सहा फेºया चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०१२१३ मुंबई-हटिया पूजा स्पेशल ही गाडी मुंबईवरून प्रत्येक शुक्रवारी २१, २८ आॅक्टोबर आणि ४, ११, १८ आणि २५ नोव्हेंबरला सुटेल. ही गाडी शुक्रवारी दुपारी ४.४५ वाजता नागपूरला येऊन ४.५५ वाजता सुटेल. रेल्वेगाडी क्रमांक ०१२१४ हटिया-मुंबई पूजा स्पेशल रेल्वेगाडी हटियावरून प्रत्येक शनिवारी २२, २९ आॅक्टोबर आणि ५, १२, १९, २६ नोव्हेंबरला शनिवारी नागपुरात रात्री १०.३५ वाजता येऊन १०.४५ वाजता रवाना होईल.