डीएन नगर ते मंडाळे अन् वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली मेट्रोला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2016 05:26 AM2016-09-28T05:26:04+5:302016-09-28T05:26:04+5:30
मुंबईतील २५ हजार ५३५ कोटी रुपये खर्चाच्या मेट्रो रेल्वे मार्ग २ ब आणि मेट्रो मार्ग-४ प्रकल्पास आज राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. दोन्हींची उभारणी मुंबई महानगर
मुंबई : मुंबईतील २५ हजार ५३५ कोटी रुपये खर्चाच्या मेट्रो रेल्वे मार्ग २ ब आणि मेट्रो मार्ग-४ प्रकल्पास आज राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. दोन्हींची उभारणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) करण्यात येणार आहे.
पहिला मार्ग डीएन नगर-मंडाळे असा असेल. त्यासाठी १० हजार ९८६ कोटी रुपये खर्च येणार आहे. २३.६४ किमी लांबीच्या या मार्गावर २२ स्थानके असतील. मेट्रो मार्ग ४ हा वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली असा असेल आणि त्यासाठी १४ हजार ५४९ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. ३२.३२ किमीच्या या मार्गावर ३२ स्थानके असतील.
पुढील वर्षीची मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असल्याचे म्हटले जाते. दोन्हींचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चालू वर्षाखेर घेऊन राजकीय श्रेय मिळविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न असेल.
या प्रकल्पांसाठी निधीची उभारणी एमएमआरडीए, विविध वित्तीय
संस्थांमार्फत करण्यात येणार आहे.
त्यासाठी राज्य सरकारवर कोणताही आर्थिक भार येणार नाही, अशी अट टाकण्यात
आली आहे.
या प्रकल्पांसाठी आवश्यक शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमिनी एमएमआरडीएकडे नाममात्र दराने हस्तांतरित करण्यात येणार आहेत. मेट्रो मार्ग २ ब प्रकल्पाच्या दुरुस्ती व देखभाल डेपोसाठी मंडाळे येथील जमीन व मेट्रो मार्ग ४ प्रकल्पाकरिता दुरुस्ती व देखभाल आगारासाठी ओवाळे येथील २० हेक्टर व
विक्रोळी येथील गोदरेजच्या ताब्यात असलेल्या १५.५ हेक्टर जमीन वापरण्यास मान्यता देण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)
सध्या हे भाडे निश्चित करण्यात आले असले तरी मेट्रो सुरू करण्यापूर्वी वित्तीय व्यवहार्यता तपासून गरज भासल्यास भाड्यामध्ये आवश्यक ते
बदल करण्याचे अधिकार एमएमआरडीएचे असतील.
अंतर(किमी) भाडे (रु.)
० ते ३ १०
३-१२ २०
१२-१८ ३०
१८-२४ ४०
२४-३० ५०
३०-३६ ६०
३६-४२ ७०