‘जय’च्या शोधासाठी ‘डीएनए’चा आधार

By admin | Published: October 4, 2016 04:35 AM2016-10-04T04:35:04+5:302016-10-04T04:35:04+5:30

पेंच अभयारण्यांतर्गत उमरेड-करांडला अभयारण्यातून बेपत्ता झालेल्या ‘जय’ नामक वाघाचे अस्तित्व शोधण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार आहे.

'DNA' basis for 'Jai' search | ‘जय’च्या शोधासाठी ‘डीएनए’चा आधार

‘जय’च्या शोधासाठी ‘डीएनए’चा आधार

Next

गणेश वासनिक,  अमरावती
पेंच अभयारण्यांतर्गत उमरेड-करांडला अभयारण्यातून बेपत्ता झालेल्या ‘जय’ नामक वाघाचे अस्तित्व शोधण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार आहे. त्याकरिता काही नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, आंतरराष्ट्रीय व्याघ्र अभ्यासकांकडून विश्लेषण केले जात असल्याची माहिती, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तीन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर मिळालेले पुरावे हे ‘जय’ सुरक्षित असल्याचे सिद्ध करते, असेही मुनगंटीवार म्हणाले.
राज्यातील वनकर्मचाऱ्यांनी २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान गडचिरोली ते नाशिकपर्यंतचे जंगल पिंजून काढले. परंतु ‘जय’च्या अस्तित्वाबाबत कोणत्याच खाणाखुणा आढळल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधला असता, ‘जय’चा अद्यापही शोध सुरूच आहे. वाघ हा एका ठिकाणी राहणारा प्राणी नाही, तो एका जंगलातून दुसऱ्या जंगलात भटकंती करीत असतो. त्यामुळे ‘जय’ पूर्णत: गायब झाला, असे म्हणणे संयुक्तिक होणार नाही. मात्र, काही अज्ञानी लोकांमार्फत अपुऱ्या माहितीच्या आधारे ‘जय’बाबत गैरसमज पसरविले जात असल्याचे ते म्हणाले. ‘जय’चे मूळ छायाचित्राद्वारे डिझाइन तयार करण्यात आले आहे.

Web Title: 'DNA' basis for 'Jai' search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.