ज्ञानेश्वर मुळे उतरणार राजकीय मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 05:09 AM2019-02-01T05:09:51+5:302019-02-01T05:10:32+5:30

मतदारसंघ अजून निश्चित झाला नसला, तरी लढायचे पक्के केले आहे, अशी घोषणा त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.

Dnyaneshwar will come down to the political field | ज्ञानेश्वर मुळे उतरणार राजकीय मैदानात

ज्ञानेश्वर मुळे उतरणार राजकीय मैदानात

googlenewsNext

- विश्वास पाटील

कोल्हापूर : भारत सरकारच्या सेवेतून सचिव (परराष्ट्र) म्हणून गुरुवारी निवृत्त झालेले ज्ञानेश्वर मुळे हे लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. मतदारसंघ अजून निश्चित झाला नसला, तरी लढायचे पक्के केले आहे, अशी घोषणा त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.

जपान दुतावासातील एक अधिकारी ते सचिव, असा तब्बल ३५ वर्षे ५ महिन्यांचा परराष्ट्र सेवेतील नोकरी केल्यानंतर त्यांना आता नवे क्षितीज खुणावत आहे. सेवेत असल्याने त्यांना आजपर्यंत राजकारण प्रवेशाची थेट घोषणा करण्यात अडचण होती; परंतु आता निवृत्त झाल्याने त्यांनी आपले पत्ते खुले केले. आजपर्यंत एका व्यवस्थेत राहून मी काम केले. आताही व्यवस्थेच्या बाहेर राहून पुन्हा चांगली व्यवस्था निर्माण करण्यासाठीच काम करायचे आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, भाजप, काँग्रेस व राष्टÑवादीशी माझी चर्चा सुरू आहे; परंतु या सर्वच पक्षांचे जागा वाटप अजून अंतिम झालेले नाही; त्यामुळे कोणाला कोणता मतदारसंघ मिळेल याबद्दल साशंकता असल्याने मग कोणत्या मतदारसंघातून व कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची हे स्पष्ट होईल.

Web Title: Dnyaneshwar will come down to the political field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.