सांगलीत एका मिनीटात ज्ञानेश्वरी, उपक्रमात दहा हजार विद्यार्थी सहभागी
By admin | Published: August 24, 2016 07:29 PM2016-08-24T19:29:30+5:302016-08-24T19:29:30+5:30
सांगली शिक्षण संस्थेच्या ९ हजार ७३७ विद्यार्थ्यानी बत्तीस दिवसात एक ओवी त्याला मिळालेल्या वहीत ३२० वेळा गिरवून ‘एक तरी ओवी.
ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 24 : ‘बोला पुंडलिक वरदा...हरी विठ्ठल ...श्री ज्ञानदेव तुकाराम...,संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जयऽऽऽ, गोपालकृष्ण महाराज की जयऽऽऽ... ’च्या जयघोषात येथील सांगली शिक्षण संस्थेच्या ९ हजार ७३७ विद्यार्थ्यानी बत्तीस दिवसात एक ओवी त्याला मिळालेल्या वहीत ३२० वेळा गिरवून ‘एक तरी ओवी...एका मिनिटात संपूर्ण ज्ञानेश्वरी ...’ हस्ताक्षराबरोबर मन घडवणारा उपक्रम पुर्ण केला . या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमाची सुरूवात १४ जुलैला झाली होती. याची सांगता आज २४ आॅगष्टला झाली. जेष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितिन खाडीलकर, उपाध्यक्ष जनार्दन लिमये,कार्यवाह शशिकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत उपक्रम पुर्ण करण्यात आला. आज संस्थेने दिलेल्या कागदावर ९ हजार ७३७ विद्यार्थ्यानी एकाचवेळी एका मिनिटात एक या प्रमाणे दोन मिनिटात दोनवेळा याप्रमाणे एका मिनिटात ज्ञानेश्वरी लिहून पुर्ण केली .
संस्थेच्या शताब्दि महोत्सवानिमित्त २६ जानेवारी २०१५ रोजी संस्थेच्या ७हजार ३३८ विद्यार्थ्यानी महालेझिमचा विश्वविक्रम केला ,याची नोंद गिनीज बुक आॅफ रेकॉर्डमध्ये झाली, यानंतर संस्थेच्या विद्यार्थ्यानी एक कोटी सुर्यनमस्काराचा संकल्पही पुर्ण केला. विद्यार्थी दशेतच असे संस्कार होण्यासाठी सांगली शिक्षण संस्थेने ‘एक तरी ओवी...’ चा उपक्रम हाती घेतला .
ज्ञानेश्वरीस नुकतीच ७२५ वर्षे पुर्ण झाली त्याचे औचित्य आणि मराठीतील सर्वात प्राचीन व ७२५ वर्षे लाखो लोकांच्या नित्य वाचनातील ग्रंथ,समृध्द भाषा आण गोडवा तसेच भगवत्गीतेच्या श्लोकासहित ओव्यांची संख्या याचा विचार करुन सांगली शिक्षण संस्थेने इयत्ता तिसरी ते आठवीपर्यतच्या ९हजार ७३७ विद्यार्थ्याना सहभागी करुन यापुर्वी कधीही न झालेला एक तरी ओवी ..एका मिनिटात संपूर्ण ज्ञानेश्वरी ...हस्ताक्षराबरोबर मन घडवणारा उपक्रम राबवला . या आगळ्या वेगळ्या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला.