मराठा आरक्षणासाठी शक्य ते सर्व करू - पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 04:45 AM2017-08-07T04:45:41+5:302017-08-08T11:21:11+5:30

मराठा आरक्षण व अन्य मागण्यांबाबत सरकारने शक्य ते सर्व केले आहे. आता उर्वरीत न्यायालयाच्या हातामध्ये आहे. तरीही सरकारच्या अखत्यारितील कोणतीही गोष्ट लक्षात आणून दिल्यास ती तातडीने करू, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे दिली.

Do all possible for Maratha reservation - Patil | मराठा आरक्षणासाठी शक्य ते सर्व करू - पाटील

मराठा आरक्षणासाठी शक्य ते सर्व करू - पाटील

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव (जि. सांगली) : मराठा आरक्षण व अन्य मागण्यांबाबत सरकारने शक्य ते सर्व केले आहे. आता उर्वरीत न्यायालयाच्या हातामध्ये आहे. तरीही सरकारच्या अखत्यारितील कोणतीही गोष्ट लक्षात आणून दिल्यास ती तातडीने करू, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे दिली.
पाटील म्हणाले, मुंबई येथे ९ आॅगस्टला निघणारा मराठा क्रांती मोर्चा शांततेने पार पडावा, यासाठी सरकारने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. मोठ्या संख्येने लोक मुंबईला जाणार आहेत. मराठा बांधवांसाठी मुंबई महापालिकेने सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. यावर्षी पावसाने ओढ दिली आहे. टंचाई व दुष्काळी परिस्थिती ओढवण्याची भीती शेतकरी वर्गात आहे. मात्र शासन शेतकºयांच्या पाठीशी आहे, हे कर्जमाफीवरून जनतेच्या लक्षात आले आहे.

अजूनही पावसाचे दिवस बाकी आहेत. त्या काळात चांगला पाऊस व्हावा, अशी अपेक्षा आहे. पाऊस किती होतो, शेती उत्पन्न किती होणार, यावर पुढील निर्णय होतील. मागील वर्षी पाऊस चांगला झाला, त्यामुळे शेतीचे उत्पन्न ४० हजार कोटींनी वाढल्याचे पाटील यांनी सांगितले.

...तर मेहता, देसार्इंवर कारवाई
मंत्री प्रकाश मेहता व सुभाष देसाई यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी केली जाईल. ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पाटील म्हणाले.

Web Title: Do all possible for Maratha reservation - Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.