बॅंकेची कामं उद्यापर्यंत करून घ्या, कारण...

By admin | Published: March 9, 2017 12:43 PM2017-03-09T12:43:32+5:302017-03-09T12:43:32+5:30

बॅंकेची महत्वाची कामं असतील तर शुक्रवारपर्यंत(दि.10) करून घ्या कारण...

Do the job of the bank till tomorrow, because ... | बॅंकेची कामं उद्यापर्यंत करून घ्या, कारण...

बॅंकेची कामं उद्यापर्यंत करून घ्या, कारण...

Next
>
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - बॅंकेची महत्वाची कामं असतील तर शुक्रवारपर्यंत(दि.10) करून घ्या कारण शनिवारपासून बॅंकांना सुट्टी आहे. थेट मंगळवारी (दि.14) बॅंकेतील कामकाज सुरू होणार आहे. याशिवाय बिहारमधील बॅंकांना बुधवारीही सुट्टी आहे. 
 
11 मार्चला दुसरा शनिवार असल्याने बॅंकांना सुट्टी आहे. तर, दुस-या दिवशी रविवार आहे. यानंतर 13 आणि 14 तारखेला होळीची सुट्टी आहे. मात्र, 14 तारखेला केवळ बिहारमधीलच  बॅंका बंद असतील. त्यामुळे बॅंकेतील महत्वाची कामं असतील तर ती उद्यापर्यंत करा, नाहीतर इतक्या मोठ्या सुट्ट्यांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे एटीएममधील पैसे संपण्याचीही शक्यता आहे.  
 
लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे रोकड काढण्यासाठी केवळ एटीएमचाच आधार असणार आहे. होळीचा सण आल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात एटीएममधून पैसे काढण्याची शक्यता आहे. नोटबंदीमुळे एटीएममध्ये अपेक्षित रोकड अजूनही पुरवण्यात येत नाही, त्यामुळे एटीएममधील पैसे संपण्याची शक्यताही नाकारता येत नाही.  

Web Title: Do the job of the bank till tomorrow, because ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.