माझ्या तक्रारी माझ्यासमोर करा, अशोक चव्हाण यांचे खडेबोल : पक्षशिस्त असलीच पाहिजे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 04:17 AM2017-10-17T04:17:51+5:302017-10-17T04:18:08+5:30

पक्षात माझ्यावर कुणाची नाराजी असेल तर त्यांनी ती पक्षाच्या व्यासपीठावर मांडली पाहिजे. मात्र, पक्षशिस्त ही असलीच पाहिजे. माझ्या तक्रारी माझ्या समोरच करा; माझ्याकडे येऊन करा. पण आधी आपला जिल्हा, मतदारसंघ सांभाळा

 Do my complaints before me, Ashok Chavan's Khateball: Partshasta must be kept | माझ्या तक्रारी माझ्यासमोर करा, अशोक चव्हाण यांचे खडेबोल : पक्षशिस्त असलीच पाहिजे  

माझ्या तक्रारी माझ्यासमोर करा, अशोक चव्हाण यांचे खडेबोल : पक्षशिस्त असलीच पाहिजे  

Next

नागपूर : पक्षात माझ्यावर कुणाची नाराजी असेल तर त्यांनी ती पक्षाच्या व्यासपीठावर मांडली पाहिजे. मात्र, पक्षशिस्त ही असलीच पाहिजे. माझ्या तक्रारी माझ्या समोरच करा; माझ्याकडे येऊन करा. पण आधी आपला जिल्हा, मतदारसंघ सांभाळा; निकाल द्या. मग इतर बाबींचे बोला, असे खडेबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी पक्षातील विरोधकांना सुनावले.
नांदेडमधील विजयानंतर खा. अशोक चव्हाण यांचे सोमवारी सकाळी नागपूर विमानतळावर आगमन झाले. यानंतर महाराष्ट्र प्रभारी खा. मोहन प्रकाश यांच्यासोबत ते यवतमाळसाठी रवाना झाले. तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना खा. चव्हाण यांंनी पक्षातील विरोधकांना सुनावले. काही दिवसांपूर्वी चव्हाण यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करीत काही नेत्यांनी दिल्लीत त्यांची तक्रार केली होती. याबाबत विचारले असता ते म्हणाले, मी स्वत: गट-तट मानत नाही. पक्षांतर्गत बाबींवर चर्चेतून मार्ग निघू शकतो. मी पदावर असेपर्यंत पक्ष बळकट करण्यावरच भर देणार. माझ्यासाठी पक्ष महत्त्वाचा आहे. मला निकालात रस आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिकेत नगरसेवकांची पळवापळवी सुरू झाली आहे. भाजपाने देशभरात सत्तेसाठी पळवापळवीचे उद्योग केले. पक्षांतर बंदी कायदा तर धुडकावून लावला. आता तेच शिवसेना करीत आहे. हे प्रकार लोकशाहीसाठी मारक आहेत, असे त्यांनी सांगितले.

भाजपाचा परतीचा प्रवास सुरू
भाजपाने केलेल्या अपप्रचाराला व दिलेल्या खोट्या आश्वासनांना जनता बळी पडली. मात्र, आता काँग्रेस बरी असल्याची जाणीव लोकांना झाली आहे. नांदेड, गुरुदासपूरच्या निकालाने लोकांना काँग्रेसकडून अपेक्षा असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र, भाजपाचा सामना करण्यासाठी काँग्रेसला जोरात तयारी करावी लागेल. नोटाबंदी, जीएसटी, कर्जमाफी, महागाई आदी मुद्यांवर सामान्य जनता त्रस्त आहे. आता भाजपचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले

आणीबाणी लावण्याचा प्रयत्न
सोशल मीडियाला हाताशी धरून भाजपा सत्तेवर आली. आता तेच हत्यार त्यांच्यावर उलटले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर बंदी घालून अप्रत्यक्षपणे आणीबाणी लावण्याचे प्रयत्न होत आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे, अशी टीका त्यांनी केली.'

नागपुरात गटबाजीचा इतिहास जुना
नागपुरातही नेत्यांचे समीकरण बसविता आले तर, मला अधिक आनंद होईल. गरज भासली तर त्यासाठी पुढाकार घेण्याची आपली तयारी आहे. मला कुणालाही प्रमोट करायचे नाही किंवा कुणाचीही बाजू घ्यायची नाही. नागपुरात गटबाजीचा इतिहास फार जुना आहे. कोणत्याही प्रदेशाध्यक्षासाठी हे काही नवीन नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title:  Do my complaints before me, Ashok Chavan's Khateball: Partshasta must be kept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.