‘बारावी निकालाच्या तारखा जाहीर नाहीत’

By admin | Published: April 13, 2017 01:26 AM2017-04-13T01:26:29+5:302017-04-13T01:26:29+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यांत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख अद्याप मंडळातर्फे जाहीर

'Do not announce dates for 12th year' | ‘बारावी निकालाच्या तारखा जाहीर नाहीत’

‘बारावी निकालाच्या तारखा जाहीर नाहीत’

Next

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यांत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख अद्याप मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले.
मार्च महिन्यांत बारावीची परीक्षा संपल्यानंतर अजूनही मंडळाने निकालाची तारीख जाहीर केलेली नाही. तथापि, फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप अथवा अन्य ठिकाणाहून येणाऱ्या माहितींवर विश्वास ठेऊ नका. बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली असे मेसेज फॉरवर्ड करुन अफवा पसरवू नका, असे आवाहन मंडळाने केले. बारावी निकालाची तारीख मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तीच खरी तारीख असेल, असे मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी स्पष्ट
केले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Do not announce dates for 12th year'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.