निवडणुकीत गाफिल राहू नका!
By admin | Published: September 5, 2014 01:47 AM2014-09-05T01:47:27+5:302014-09-05T01:47:27+5:30
‘तुम्ही जागा वाटपाची आणि युतीचे काय होणार याची चिंता करू नका’, अशा शब्दांत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी आश्वस्त केले.
Next
मुंबई : शिवसेना, भाजपा युतीमध्ये जागावाटपावरून तणाव निर्माण झाल्याने अस्वस्थ असलेल्या भाजपा कार्यकत्र्याना ‘तुम्ही जागा वाटपाची आणि युतीचे काय होणार याची चिंता करू नका’, अशा शब्दांत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी आश्वस्त केले. मात्र वातावरण अनुकूल आहे असे समजून गाफिल न राहाता कार्यकत्र्यानी घरोघरी जाऊन प्रचार करावा, असा कानमंत्रही शहा यांनी दिला.
मुंबई भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या विजय संकल्प मेळाव्यात शहा बोलत होते. महाराष्ट्रात काँग्रेसला पराभूत करायचे आहे. महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य निर्माण करणा:या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव स्वराज्याबरोबरच सुराज्यासाठी ओळखले जात होते. मात्र त्याच महाराष्ट्रात सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी 11 लाख 88 हजार कोटींचे घोटाळे केले, असा आरोप करून डब्लूटीओसोबत शेतक:यांच्या विरोधी निर्णय होत असताना तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची कुठल्या उद्योगपतीसोबत बैठक सुरू होती, असा सवालही त्यांनी केला.
महाराष्ट्रातून जोर्पयत काँग्रेस उखडली जात नाही, तोर्पयत काँग्रेसमुक्त भारत निर्माण होणार नाही, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातही विरोधी पक्षनेतेपदासाठी याचना करण्याची वेळ सध्याच्या सत्ताधा:यांवर आली पाहिजे, असा निर्धार करा, असे शहा म्हणाले.
महाराष्ट्रातच दुष्काळ का?
राजाची नियत चांगली नसेल तर निसर्गाचाही कोप होतो. महाराष्ट्रात काँग्रेसचे शासन असल्यामुळेच सतत दुष्काळ पडत आहे तर त्याचवेळी गुजरातमध्ये नरेंद्र मोदींचे सरकार असताना 12 वर्षात एकदाही दुष्काळ पडला नाही, असा दावाही शहा यांनी केला.
घोटाळ्यांची चौकशी करू-फडणवीस
गेले काही दिवस मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रात्ररात्र जागून फायलींवर सह्या करत आहेत. राज्यात आमचे सरकार आल्यावर आम्ही त्यातील बेकायदा निर्णयांचा फेरविचार करू, त्याचबरोबर सिंचनाच्या घोटाळ्य़ाबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला अजित पवार आणि सुनील तटकरे यांची चौकशी करण्याची परवानगी देऊ. महाराष्ट्र हे छत्रपती शिवरायांचे राज्य असल्याने या निवडणुकीत छत्रपतींचा आशिर्वाद, चलो चले मोदी के साथ ही आमची घोषणा असेल, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची भाषणो झाली.
कोण आहेत
हे अमित शहा?
मुंबई : कोण आहेत हे अमित शहा? ज्यांच्या नावामागे तडिपार, एन्काऊंटर करणारे, महिलांची टेहळणी अशी बिरुदावली लागली आहेत , तेच का हे साहेबांचे चेले? अशा शब्दांत काँग्रेसने भाजपाध्यक्ष अमित शहांचा समाचार घेतला.
महाराष्ट्राला शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी कोणा शहाची आवश्यकता नसल्याचे सांगतानाच लोकसभेवेळी स्वप्न दाखविली, मात्र जनतेचा भ्रममिनरास झाला आहे. आता भाजपा सरकार आल्यावर पाऊस पडेल आणि दुष्काळ
पडणार नाही असे म्हणण्यार्पयत भाजपा नेत्यांची मजल गेल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. (प्रतिनिधी)