निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्प नको - उद्धव ठाकरे

By Admin | Published: January 4, 2017 05:40 PM2017-01-04T17:40:06+5:302017-01-04T18:49:35+5:30

निवडणूकीत जाती, धर्माच्या आधारावर मत मागू नयेत असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे दिला. त्याचप्रमाणे निवडणूकीच्या तोंडावर बजेटमधून..

Do not budget for elections - Uddhav Thackeray | निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्प नको - उद्धव ठाकरे

निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्प नको - उद्धव ठाकरे

googlenewsNext
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 4 -  निवणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्प जाहीर झाल्यास सत्ताधारी पक्ष त्याचा गैरफायदा घेऊ शकतो. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अर्थसंकल्प मांडू नये, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी व्यक्त केले आहे. "सत्ताधारी पक्षही निवडणुकीत सहभागी होत असतो. त्यामुळे  निवडणुकीदरम्यान बजेटमधून आकर्षक घोषणा केल्या जातात. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अर्थसंकल्प मांडू नये, अशी मागणी उद्धव यांनी केली. 
आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज रंगशारदा येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तोडण्यासाठी उत्सूक असलेल्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. नोटाबंदी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर मुद्यांवरून आक्रमक भूमिका मांडली. 
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, की, "शिवसेना काय बोलते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते.  मी जे काही करेन ते बोलून करणार, न बोलून काही करणार नाही. आपण कुठे नेऊन महाराष्ट्र ठेवला बघायची गरज आहे आणि मला बोलू न देणारा जन्माला यायचा आहे." 
नरेंद्र मोदी यांच्यावरही उद्धव यांनी जोरदार शरसंधान केले, "मोदींनी जाहीर केलेल्या काही योजना जुन्याच आहेत. हिंदू धर्माच्या नावावर मत मागत नाही, पण हिंदू धर्माच रक्षण करण्याची गरज पडली तर आम्ही मागे हटणार नाही.  हिंदुत्व कधीही सोडणार नाही."
यावर्षी फेब्रुवारीच्या एक तारखेला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. त्यावरही उद्धवनी वाग्बाण सोडले. "सत्ताधारी पक्षही निवडणुकीत सहभागी होत असतो. त्यामुळे  निवडणुकीदरम्यान बजेटमधून आकर्षक घोषणा केल्या जातात. त्यामुळे विरोधी पक्षांना फटका बसू शकतो. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अर्थसंकल्प मांडू नये," त्यासाठी राष्ट्रपतींकडे विशेषाधिकार असतील तर त्यांनी ते वापरावेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

Web Title: Do not budget for elections - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.