अपेक्षेने शिवसेनेत येऊ नका - उद्धव
By admin | Published: June 26, 2014 12:57 AM2014-06-26T00:57:32+5:302014-06-26T00:57:32+5:30
आता शिवबंधनासाठी सर्वच राजकीय पक्षांतून रांगा लागल्या आहेत. तथापि, मला काहीतरी मिळेल, या आशेने शिवसेनेत येऊ नका.
Next
>पुणो : शिवबंधनाने काय होणार, अशी थट्टा सुरुवातीला अनेकांनी केली. पण आता शिवबंधनासाठी सर्वच राजकीय पक्षांतून रांगा लागल्या आहेत. तथापि, मला काहीतरी मिळेल, या आशेने शिवसेनेत येऊ नका. अशी अपेक्षा घेऊन आलेल्यांची मला गरज नाही, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिला.
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यभरात शिवसेनेचे मेळावे होणार आहेत. त्याला बुधवारी पुण्यातून प्रारंभ झाला. त्या वेळी ठाकरे बोलत होते. शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार गजानन कीर्तीकर, शिवाजी आढळराव पाटील, श्रीरंग बारणो, आमदार नीलम गो:हे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
वारीच्या मार्गात स्वच्छतागृहाची सुविधा द्यावी अन्यथा वारी बंद करावी, असे न्यायालयाने शासनाला फटकारले आहे. परंतु जाहिरातींसाठी 1क्क् ते 2क्क् कोटींची तरतूद करणा:या शासनाकडे वारक:यांना सुविधा देण्यासाठी निधी नाही, अशी टीका ठाकरे यांनी केली.
लवासासारखे 26 प्रकल्प उभे राहिले पाहिजेत, असे शरद पवार यांना पुन्हा वाटत आहे. गोरगरीब नागरिकांना परवडणारी घरे मिळण्यासाठी त्यांनी कधी पाठपुरावा केला नाही, अशी टीका करून ते म्हणाले, पुण्याच्या माहेरघराला शैक्षणिक हब करण्यात येईल आणि त्यासाठी आमचे सरकार बांधील राहील. (प्रतिनिधी)