शैक्षणिक गुणवत्तेशी तडजोड करणार नाही

By admin | Published: September 19, 2016 04:41 AM2016-09-19T04:41:17+5:302016-09-19T04:41:17+5:30

‘सबको शिक्षा, अच्छी शिक्षा’ या उक्तीनुसार शिक्षणाच्या गुणवत्तेवर अधिक भर देण्यात येणार आहे.

Do not compromise educational merit | शैक्षणिक गुणवत्तेशी तडजोड करणार नाही

शैक्षणिक गुणवत्तेशी तडजोड करणार नाही

Next


मुंबई : ‘सबको शिक्षा, अच्छी शिक्षा’ या उक्तीनुसार शिक्षणाच्या गुणवत्तेवर अधिक भर देण्यात येणार आहे. शैक्षणिक गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यात येणार नाही. गरीब, दलित, उपेक्षित आणि वंचित लोकांच्या उन्नतीसाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.
जाएंट्स इंटरनॅशनलतर्फे शनिवारी नरिमन पॉईंट येथील ट्रायडंट हॉटेलच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ४४ व्या जाएंट्स पुरस्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश जावडेकर बोलत होते. यावेळी पत्रकारितेतील अमूल्य योगदानाबद्दल ‘लोकमत’ मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांना प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जाएंट्स इंटरनॅशनलचे वर्ल्ड चेअरमन नाना चुडासमा, भाजप नेत्या आणि जाएंट्स इंटरनॅशनलच्या वर्ल्ड चेअरपर्सन शायना एन.सी आदी मान्यवर उपस्थित होते. शिवाय उद्योग, आरोग्य, राजकारण, समाजसेवा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शविली.
प्रकाश जावडेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले होते. अशा प्रसंगी माझ्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्याचे भाग्य लाभले त्याबद्दल आभारी आहे. १९८० साली नाना यांच्यासोबत पहिली भेट झाली होती. तेव्हापासून त्याच्यांसोबत आपुलकीचे संबंध आहेत. नानांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन अतिशय उपयुक्त ठरले आहे. या गौरवसंध्येत ज्यांचा सन्मान करण्यात आला त्या सर्व व्यक्ती समाजाच्या विविध घटकांमध्ये महत्त्वाचे योगदान देऊन आपल्या देशाला गौरवशाली बनवित आहेत. विजय दर्डा हे राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत, असे वाटत नाही. गेली अनेक वर्षे त्यांच्याशी माझे ऋणानुबंध आहेत. ‘लोकमत’च्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षांपासून दर्डा लोकांचे मत समाजासमोर मांडत आहेत.
शायना एन.सी. म्हणाल्या की, जाएंट्सच्या माध्यमातून समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली. समाजातील दुर्लक्षित आणि वंचित घटकांचा आधारस्तंभ होण्याचे कार्य गेली अनेक वर्ष जाएंट्स करत आहेत.
हा पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी हातभार लावणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. त्यामुळे कृतज्ञ राहून हा सामाजिक बांधिलकीचा वसा अविरत सुरु राहो. (प्रतिनिधी)

Web Title: Do not compromise educational merit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.