कागदी घोडे नाचवू नका
By admin | Published: December 2, 2014 02:52 AM2014-12-02T02:52:18+5:302014-12-02T02:52:18+5:30
विदर्भातील दुष्काळी स्थिती भयावह आहे. शेतकऱ्यांना वेदना असह्ण झाल्याने शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. ही चिंतेची बाब
अकोला : विदर्भातील दुष्काळी स्थिती भयावह आहे. शेतकऱ्यांना वेदना असह्ण झाल्याने शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. ही चिंतेची बाब असून, सरकारने कागदी घोडे न नाचविता दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते एकनाथ शिंदे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
बाळापूर तालुक्यातील मनारखेड येथील अल्पभूधारक वृद्ध शेतकरी काशीराम इंदोरे यांनी स्वत:च चिता रचून आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यासाठी एकनाथ शिंदे अकोला दौऱ्यावर आले आहेत. अमरावती विभागातील दुष्काळी भागाचा दौराही ते करीत आहेत.
श्ािंदे यांनी राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात होत असलेल्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली. आजचे मुख्यमंत्री जेव्हा विरोधी बाकांवर बसत होते, तेव्हा त्यांनीच दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. आज मात्र ते दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा करीत
आहेत.
केंद्राकडून येणारी समिती पाहणी करेल, त्यानंतर ते अहवाल सादर करतील आणि त्यानंतर दुष्काळ जाहीर होईल. तोपर्यंत शेतकऱ्यांच्या वेदना कोण जाणून घेणार ? केंद्राने दुष्काळी भागासाठी पॅकेज जाहीर केले पाहिजे. त्यापूर्वी राज्य शासनाने त्यांच्या तिजोरीतून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली. (प्रतिनिधी)