दिल्लीत जाऊ नका, 'या' भाजप नेत्याची फडणवीसांना हात जोडून विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 12:27 PM2020-02-08T12:27:53+5:302020-02-08T12:28:36+5:30

देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा सध्या भाजपच्या वर्तुळात सुरु आहे.

Do not go to Delhi BJP leader requested to Fadnavis | दिल्लीत जाऊ नका, 'या' भाजप नेत्याची फडणवीसांना हात जोडून विनंती

दिल्लीत जाऊ नका, 'या' भाजप नेत्याची फडणवीसांना हात जोडून विनंती

googlenewsNext

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा सध्या भाजपच्या वर्तुळात सुरु आहे. दिल्ली निवडणुकीनंतर फडणवीस यांना राष्ट्रीय पातळीवरच्या एका मोठ्या संघटनात्मक पदाची जबाबदारी किंवा केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देणार असल्याचं बोललं जात आहे. तर फडणवीस यांनी दिल्लीत जाऊ नयेत अशी विनंती भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांनी केली आहे.

परभणी येथील एका कार्यक्रमात बोलत असताना लोणीकर म्हणाले की, इस्रायेलच्या धर्तीवर 20 हजार कोटींच्या मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मंजुरी दिली. त्यामुळे मराठवाड्यातील लोकांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी मुबलक पाणी मिळणार आहे. तसेच याचा फायदा उद्योगधंद्याना सुद्धा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी फक्त फडणवीसचं काम करू शकतात त्यामुळे तुम्ही दिल्लीत जाऊ नयेत, अशी हात जोडून लोणीकर यांनी फडणवीस यांना विनंती केली.

तर फडणवीस यांना भाजपचे नेतृत्व लवकरच राज्यसभेवर पाठविणार असून त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या चर्चेमुळे भाजपचे राज्यातील आमदार आणि इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेले आमदार, नेते यांच्यात अस्वस्थता आहे. या बाबत त्यांनी थेट फडणवीस यांनाच विचारणा केली. त्यावर, ‘मी कुठेही जाणार नाही’ असे फडणवीस यांनी सांगितले.


 

Web Title: Do not go to Delhi BJP leader requested to Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.