डॉक्टरांना साक्षीसाठी तासन्तास रखडवू नका

By admin | Published: October 23, 2015 02:37 AM2015-10-23T02:37:11+5:302015-10-23T02:37:11+5:30

रुग्णांचे प्राण वाचवणे, हे डॉक्टरांचे प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे साक्ष देण्यासाठी न्यायाधीश त्यांना अनिश्चित काळासाठी कोर्टात बसवू शकत नाहीत, असे नमूद करत डॉक्टरांची

Do not keep the doctor in the hour for the witness | डॉक्टरांना साक्षीसाठी तासन्तास रखडवू नका

डॉक्टरांना साक्षीसाठी तासन्तास रखडवू नका

Next

- दीप्ती देशमुख,  मुंबई
रुग्णांचे प्राण वाचवणे, हे डॉक्टरांचे प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे साक्ष देण्यासाठी न्यायाधीश त्यांना अनिश्चित काळासाठी कोर्टात बसवू शकत नाहीत, असे नमूद करत डॉक्टरांची साक्ष नोंदवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्याची आवश्यकता असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने व्यक्त केले.
क्रिमिनल मॅन्युअलमध्ये सरकारी वकील आणि खासदार तसेच इतरांना साक्षीदार म्हणून बोलवण्याची तरतूद आहे; मात्र डॉक्टर आणि तज्ज्ञांना साक्षीदार म्हणून समन्स बजावण्याची तरतूद नाही. त्यामुळे अशा साक्षीदारांना विशेषत: डॉक्टरांना एखाद्या केसमध्ये साक्षीदार म्हणून समन्स बजावण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्याची आवश्यकता आहे, असे मत न्या. ए.बी. चौधरी व न्या. आय.के. जैन यांच्या खंडपीठाने व्यक्त केले. एका डॉक्टरने एफआयआर रद्द करण्यासाठी केलेल्या अर्जावर सुनावणीवेळी कोर्टाने हे मत व्यक्त केले.
सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील शुश्रूषा रुग्णालयाचे डॉक्टर संजय अंधारे यांच्याविरुद्ध उस्मानाबादमधील परांडा पोलीस स्टेशनमध्ये न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला. एफआयआर रद्द करण्यात यावा, यासाठी डॉ. अंधारे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
याचिकेनुसार, डॉ. अंधारे यांना एका केसमध्ये साक्षीदार म्हणून अनुपस्थित राहिल्याबद्दल परांडा दंडाधिकाऱ्यांनी अजामीनपत्र वॉरंट बजावले. त्यामुळे डॉ. अंधारे यांना दंडाधिकाऱ्यांपुढे हजर राहावे
लागले. कोर्टात उपस्थित असतानाच त्यांना, एका रुग्णाची प्रकृती
अतिशय चिंताजनक असल्याचा रुग्णालयामधून फोन येत होता. मात्र अजामीनपात्र वॉरंट बजावल्याने अंधारे यांना कोर्टातून हलता आले नाही. दुर्दैवाने त्या रुग्णाचा मृत्यू
झाला. त्यामुळे वैतागलेल्या
अंधारेंनी कोर्टाचे कामकाज सुरू असताना मोठ्या आवाजात आपण येथे अधिक काळ वाट पाहू शकत नाही, असे म्हटले. त्यांच्या या वर्तवणुकीममुळे कोर्टाने कामकाजात अडथळा निर्माण केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये? याचे स्पष्टीकरण मागितले. मात्र वेळेत स्पष्टीकरण न दिल्याने कोर्टाने त्यांना १ हजार रुपयांचा दंड ठोठावला. हा दंड भरून अंधारे यांनी हे प्रकरण मिटवले.
मात्र या केसमधील वकिलांनी अंधारे यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर
नोंदवला.
साक्षीदार म्हणून कोर्टात आलेल्या सरकारी कर्मचारी व डॉक्टर्सना कोर्टात कशी वागणूक मिळते, हे या केसमधून निदर्शनास आले. याचा अर्थ कोणीही येऊन कोर्टाचा अवमान करेल, असा होत नाही. पण त्याचवेळी कोर्ट डॉक्टरांना साक्ष देण्यासाठी अनिश्चित काळासाठी वाट पाहायला लावू शकत नाही, असे म्हणत खंडपीठाने दंडाधिकाऱ्यांनी अजामीनपात्र वॉरंट बजावण्याचा घेतलेला निर्णय अयोग्य ठरवला.

वकिलाला ठोठावला पाच हजारांचा दंड
आमच्या मते, डॉक्टरांना साक्षीदार म्हणून बोलवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखणे आवश्यक आहे. डॉक्टरांशी संपर्क साधण्यासाठी काही नियम असणेही गरजेचे आहे. डॉक्टरांना साक्षीदार म्हणून कोर्टात बोलवण्यापूर्वी साक्ष नोंदवण्याचा दिवस आणि वेळ निश्चित करण्यात यावी आणि त्याच वेळी साक्ष नोंदवण्यात यावी.
कदाचित त्या दिवशी कोर्ट सुटीवर असू शकते. पण अशा वेळी संबंधित डॉक्टरला तसे कळवण्याची व्यवस्थाही उपलब्ध असली पाहिजे, असे म्हणत खंडपीठाने एफआयआर नोंदवणाऱ्या वकिलाला डॉक्टरला मानसिक त्रास दिल्याबद्दल ५ हजार रुपयांचा दंडदेखील ठोठावला.

Web Title: Do not keep the doctor in the hour for the witness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.