जायकवाडीतून पाणी सोडलेच नाही, अफवेमुळे गोदाकाठच्या गावांमध्ये भीती तर प्रशासनास डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 09:19 PM2017-09-19T21:19:18+5:302017-09-19T21:19:42+5:30

पैठण येथील जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आल्याची अफवा पसरल्याने गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Do not leave water from Jaikwadi, rumors threaten Godavari's villages, and administrative headaches | जायकवाडीतून पाणी सोडलेच नाही, अफवेमुळे गोदाकाठच्या गावांमध्ये भीती तर प्रशासनास डोकेदुखी

जायकवाडीतून पाणी सोडलेच नाही, अफवेमुळे गोदाकाठच्या गावांमध्ये भीती तर प्रशासनास डोकेदुखी

Next

औरंगाबाद, दि. 19 : पैठण येथील जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आल्याची अफवा पसरल्याने गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जायकवाडी प्रशासनास मंगळवारी दिवसभर लोकांनी फोन करून याबाबत विचारणा केली. त्यामुळे धरण प्रशासनाने सायंंकाळी अधिकृत प्रेसनोट काढून पाणी सोडले नसल्याचा खुलासा केला आहे.

या बाबत धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले की, मंगळवारी प्रकल्पाचे एक ही गेट उघडले नाही. ह्यजायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीत पाणी सोडलेह्ण अशी बातमी सोशल मीडियावरून पसरविली जात आहे ती पूर्णपणे खोटी आहे. अशा अफवांवर लोकांनी विश्वास ठेऊ नये.

धरणामध्ये मंगळवारी ६७.५३ टीएमसी म्हणजे ८८.१० टक्के जलसाठा असून आवाक ४३०० क्युसेक होती. नाशिककडून येणाºया पाण्याची आवाक मंदावली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. पाणी सोडल्याच्या अफवांमुळे गोदाकाठच्या अनेक गावांत एकच गोंधळ उडाला. पूराच्या भीतीने गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. वाढता साठा पाहता जायकवाडीतून पाणी सोडण्यात येणार असल्याची मागच्या आठवड्यापासून जोरदार चर्चा सुरू आहे.

गेल्या आठवड्यात लोकमतशी बोलताना लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) कार्यालयाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक बी. एस. स्वामी यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता. ते म्हणाले, जायकवाडीतील पाणी पातळी ९४ टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

Web Title: Do not leave water from Jaikwadi, rumors threaten Godavari's villages, and administrative headaches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण