शेतक-यांची घुसमट होऊ देऊ नका !

By admin | Published: October 26, 2015 01:54 AM2015-10-26T01:54:28+5:302015-10-26T01:54:28+5:30

नाना पाटेकर यांनी प्रतकार परिषदेत नागरिकांना केले अवाहन.

Do not let the farmers insult! | शेतक-यांची घुसमट होऊ देऊ नका !

शेतक-यांची घुसमट होऊ देऊ नका !

Next

बुलडाणा : शेतकर्‍यांची विविध कारणांमुळे घुसमट होत असल्यामुळे तो नैराश्येपोटी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. शेतकर्‍यांची ही घुसमट थांबविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर यांनी केले. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून बुलडाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील १३८ शेतकरी कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपूरे रविवारी बुलडाणा येथे आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाना पाटेकर पुढे म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती आपल्या कामात व्यस्त असतो, आपल्याच आनंदात असतो. मात्र आता मनाच्या भींती तोडून एकमेकांच्या दु:खात सहभागी झाले पाहिजे. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या कुटुंबाच्या मदतीसाठी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून चळवळ सुरू झाली आहे. या चळवळीत प्रत्येकाने सहभागी व्हावे, कारण ही चळवळ लोकांनी लोकांसाठी चालविलेली चळवळ आहे. या चळवळीत मकरंद फार वर्षापासून आहे.आता या कामाला अनेकांची साथ मिळत असल्यामुळे ह्यनामह्ण च्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात काम सुरू झाले आहे. नैराश्येपोटी मृत्युला कवटाळलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबाच्या संवेदना आपल्याला जाणवल्या म्हणून या चळवळीत आलो. यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. मकरंद अनासपुरे म्हणाले की, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत देऊन थांबणार नाही. त्यांच्यामध्ये जगण्याचं बळ निर्माण करण्यासाठी आपल्याला काम करावे लागणार आहे. मराठवाड्यानंतर विदर्भ, खान्देशमधील आ त्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत देण्यात येत आहे. पुढील टप्प्यात थेट कार्यक्रमा तून मदत न देता, नामच्या कार्यकर्त्यांंच्या माध्यमातून मदत देण्यात येईल. घरातील क र्ता पुरुष जाण्यामुळे त्या कुटुंबाला जगण्याचं बळ निर्माण करण्यासाठी छोटे व्यवसाय, उद्योग मिळवून देण्यासाठी सुध्दा काम करणार असल्याचे मकरंद अनासपुरे यांनी यावेळी सांगितले. यावेळी अँड.विजय सावळे, अँड. दिपक पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Do not let the farmers insult!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.