कायद्याला धक्का लावू देणार नाही !
By Admin | Published: September 4, 2016 03:36 AM2016-09-04T03:36:31+5:302016-09-04T03:36:31+5:30
कोणत्याही परिस्थितीत अॅट्रॉसिटी कायद्याला धक्का लावू देणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगलीत दिली.
- आठवले यांचा दावा
सांगली : कोणत्याही परिस्थितीत अॅट्रॉसिटी कायद्याला धक्का लावू देणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगलीत दिली.
सर्वपक्षीय सत्काराला उत्तर देताना आठवले म्हणाले की, कोपर्डी घटना चीड आणणारी आहे. अत्याचार करणारे दलित समाजाचे असले तरी त्यांना फाशीची शिक्षा करावी, अशी आमचीही मागणी आहे. मराठा समाजाने या घटनेचा जरूर तेवढा निषेध करावा. आम्हीसुद्धा त्याचा निषेध करीत आहोत, मात्र अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी करणे चुकीचे आहे. या कायद्याचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी आहेत. असा गैरवापर होणार नाही, यासाठी कडक भूमिका घेऊ. अॅट्रॉसिटीचा विषय माझ्या अखत्यारीतील आहे. त्यामुळे त्याला मी धक्का लावू देणार नाही.
शरद पवारांनी कधीच दलितांविरोधी भूमिका घेतली नाही. त्यांनी दलितांसाठी खूप काम केले आहे, असेही आठवले म्हणाले.