शेतकऱ्यांची घुसमट होऊ देऊ नका! - नाना पाटेकर

By admin | Published: October 26, 2015 02:50 AM2015-10-26T02:50:17+5:302015-10-26T02:50:17+5:30

शेतकऱ्याची विविध कारणांमुळे घुसमट होत असल्याने नैराश्येपोटी तो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. त्याची घुसमट थांबविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन अभिनेते नाना पाटेकर यांनी केले

Do not let the peasants roam! - Nana Patekar | शेतकऱ्यांची घुसमट होऊ देऊ नका! - नाना पाटेकर

शेतकऱ्यांची घुसमट होऊ देऊ नका! - नाना पाटेकर

Next

बुलडाणा : शेतकऱ्याची विविध कारणांमुळे घुसमट होत असल्याने नैराश्येपोटी तो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. त्याची घुसमट थांबविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून बुलडाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील १३८ शेतकरी कुटुंबांतील महिलांना आर्थिक मदत देण्यात आली.
प्रत्येक व्यक्ती आपल्या कामात व्यस्त असते. आपल्याच आनंदात असते. मात्र आता मनाच्या भिंती तोडून एकमेकांच्या दु:खात सहभागी झाले पाहिजे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून चळवळ सुरू झाली आहे. त्यात प्रत्येकाने सहभागी व्हावे. लोकांनी लोकांसाठी चालविलेला हा उपक्रम आहे. या चळवळीत मकरंद फार वर्षांपासून आहे. आता या कामाला अनेकांची साथ मिळत असल्यामुळे ‘नाम’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम सुरू झाले आहे. नैराश्येपोटी मृत्यूला कवटाळलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या संवेदना आपल्याला जाणवल्या म्हणून या चळवळीत आलो, असे नाना म्हणाले.
अनासपुरे म्हणाले की, शेतकरी कुटुंबांना मदत देऊन थांबणार नाही. त्यांच्यामध्ये जगण्याचे बळ निर्माण करण्यासाठी आपल्याला काम करावे लागणार आहे. पुढील टप्प्यात ‘नाम’च्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मदत देण्यात येईल. घरगुती उद्योग मिळवून देण्यासाठीसुद्धा काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Do not let the peasants roam! - Nana Patekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.