मत हटना पिछे, चाहे इंच इंच कट जाना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2017 12:21 AM2017-02-05T00:21:27+5:302017-02-05T00:21:27+5:30

‘‘घर परिवार कुशल है मुन्ने, गाव, गली में मंगल है! कश्मीर की घटना से अब, कदम कदम पर हलचल है! ये केवल खत नही लाडले, घरभर का संदेश समज! एक एक अक्षर के पिछे

Do not move backward, whether inch inches cut! | मत हटना पिछे, चाहे इंच इंच कट जाना!

मत हटना पिछे, चाहे इंच इंच कट जाना!

Next

अहमदनगर : ‘‘घर परिवार कुशल है मुन्ने, गाव, गली में मंगल है! कश्मीर की घटना से अब, कदम कदम पर हलचल है!
ये केवल खत नही लाडले, घरभर का संदेश समज! एक एक अक्षर के पिछे, अपना पुरा देश समज! धवल बर्फ की चादर पर तू, जय हिंद लहू से लिख आना! एक इंच मत हटना पिछे, चाहे इंच इंच कट जाना!’’
देशप्रेमी आईने लिहिलेले हे पत्र आहे एका सैनिक मुलाला. याच भावनेतून देशासाठी समर्पित होण्याची, देशरक्षण आणि प्रसंगी बलिदानाची शपथ घेत ३६ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या १८५ जवानांनी सैन्यात प्रवेश केला.
शनिवारी सकाळी सात वाजता एमआयआरसी येथील अखौरा ड्रिल स्टेडिअमवर उत्कृष्ट संचलन करत या जवानांनी सैन्यात प्रवेश केला. प्रथम डेप्युटी कमांडंट यू. एम. विशाल, त्यानंतर एमआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडिअर व्ही. व्ही. सुब्रमण्यम व त्यानंतर सोहळ्याचे प्रमुख पाहुणे अ‍ॅडिशनल डायरेक्टर जनरल मिलिटरी आॅपरेशन मेजर जनरल जे. के. शर्मा यांनी मानवंदना स्वीकारली. त्यानंतर मे. जनरल शर्मा, सुब्रमण्यम यांनी परेडचे निरीक्षण केले. (प्रतिनिधी)

१८५ जवानांचा सैन्यात प्रवेश
देशभरातील उत्कृष्ट सैन्य प्रशिक्षण केंद्रातील एक असलेल्या येथील आर्मर्ड कॉर्पस् सेंटर अ‍ॅण्ड स्कूल (एसीसी अ‍ॅण्ड एस)मध्ये सैन्य अधिकाऱ्यांनी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा दिला. येथे सेवा करून पुढे देशभर तैनात असलेल्या विविध रेजिमेंटचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे, यात दोन निवृत्त लष्करप्रमुखांचा समावेश होता. आर्मर्ड कॉर्पस् सेंटर अ‍ॅण्ड स्कूल (एसीसी अ‍ॅण्ड एस) हे उच्चतम लष्करी प्रशिक्षण केंद्र आहे. प्रामुख्याने रणगाडा, क्षेपणास्त्र व इतर शस्त्रांचे प्रशिक्षण येथे जवानांसह लष्करी अधिकाऱ्यांनाही दिले जाते. येथे दर पाच वर्षांनी स्नेहसंमेलन आयोजित केले जाते. हे तिसरे संमेलन होते. जवानांनी शानदार संचलन करत परेडची झलक दाखवली.

- ३६ आठवड्यांच्या या खडतर प्रशिक्षणादरम्यान १८५ जवानांमधून तिघांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्याबद्दल त्यांना एमआरसी सेंटरचे जनक जनरल सुंदरजी यांच्या स्मरणार्थ पदक प्रदान करण्यात आले. यात सूरजसिंग (सुवर्णपदक), अविनाश कुमार (रौप्यपदक) व राहुल जटराना (कांस्यपदक) यांना शर्मा यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Web Title: Do not move backward, whether inch inches cut!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.