इंग्रजीला अव्हेरू नका, पण मराठीची उंची वाढवणे गरजेचे - डॉ. अक्षयकुमार काळे
By admin | Published: February 3, 2017 08:55 PM2017-02-03T20:55:26+5:302017-02-03T21:16:37+5:30
सध्या आपल्यासमोर मराठी भाषा संवर्धनाचा प्रश्न उभा आहे. इंग्रजी भाषा आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे मोठे आव्हान मराठी
Next
>अनिकेत घमंडी/ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. 3 - सध्या आपल्यासमोर मराठी भाषा संवर्धनाचा प्रश्न उभा आहे. इंग्रजी भाषा आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे मोठे आव्हान मराठीसमोर आहे. बदलत्या काळानुसार इंग्रजीला अव्हेरू नका, पण आपल्या मराठीची उंची वाढवणेही गजरेचे आहे. असे मत 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अक्षयकुमार काळे यांनी संमेलनाच्या उद्धाटनप्रसंगी व्यक्त केले.
काळे म्हणाले, "मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण काय केले, याचा विचार व्हायला हवा. सगळ्यांनी मराठीकडे पाठ फिरवली. इंग्रजीला खैरात वाटली. सध्या आपल्या मराठी शाळा भिकाऱणीसारख्या अवस्थेत आहेत. तर त्या इंग्रजी शाळा पंचतारांकित रूपात ऊभ्या आहेत. इंग्रजी भाषा अव्हेर करू नका, पण आपल्या भाषेची उंची वाढवणं गरजेचे आहे.
मराठी भाषा अनिवार्य करा असेही आवाहन त्यांनी संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलताना केले. "मराठी भाषा अनिवार्य करा, केवळ अनिवार्य नको तर त्याचा गंभीर विचार व्हावा. हिंदी आक्रमणाबाबत ओरड आहे. आपल्या भाषेत इंग्रजी शब्द आले त्यामुळे ती अधिक कलुषित झाली. आपण मराठी शब्दांचा उल्लेख टाळतो. ती टिकवायची असेल तर शब्द वापर वाढवायला हवे."
मराठी लेखक आत्मनिष्ठ नाहीत असा टोलाही संमेलनाध्यक्षांनी लगावला. ते म्हणतात, लेखकाची व्यापकता समजून घेणे गरजेचे आहे. लेखकाजवळ निकोप विचार दृष्टी असावी. लेखक जगण्याचा पातळीवर साहित्य निर्मन करतात. त्यामुळं ते लिखाण सूक्ष्म होते. लेखकाच्या लिखाणात शब्द विचार असतात. जीवनदृष्टी हीच वाड्मय दृष्टी होते. लेखकाचे प्रश्न हे जीवणानुभवाचे प्रश्न असतात. ते तो मांडतो. त्यातूनच चिंतन होते. कोणताही श्रेष्ठ लेखक हा जीवनातील अनुभव अनुभूती आणि साक्षात्कार हा येत असतो त्यावरच तो जगतो." असे त्यांनी लेखकाबाबतचे आपले विचार मांडताना सांगितले. समीक्षणाबाबतही आपली भूमिका मांडली. "मी एक समीक्षक आहे, त्यावरही मी बोलणार आहे. समीक्षक लेखकाला खिंडीत गाठून भय निर्माण करत नाही, पण समीक्षेचे अस्तित्व महत्वाचे आहे, समीक्षेच्या पाठराखणीनेच लेखकाचे भवितव्य घडते." असेही ते म्हणाले.