'या' गोष्टी फेसबुकवर शेअर करू नका!...
By admin | Published: January 31, 2017 04:54 PM2017-01-31T16:54:43+5:302017-01-31T17:04:03+5:30
फेसबुकवर माहिती शेअर करताना जागरूक राहणे आवश्यक आहे. विशेषतः फेसबुकवर खालील काही गोष्टी शेअर करू नका...
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31 - सोशल नेटवर्कसाठी जगप्रसिद्ध असलेलं फेसबुक सध्या बहुतांश लोकांच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. फेसबुकवरून आपल्याला लोकांशी कनेक्ट होता येत असले तरी हे कनेक्शन तुम्हाला महागात पडू शकते. होय, सायबर क्राईमचे दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रमाण लक्षात घेता फेसबुकवर माहिती शेअर करताना जागरूक राहणे आवश्यक आहे. विशेषतः फेसबुकवर खालील काही गोष्टी शेअर करू नका...
फोन नंबर : प्रत्येकजण हा काहींना काही कामामुळे फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर आपला मोबाईल नंबर शेअर करत असतो. पण तुमच्या या मोबाईल नंबरचा देखील गैरवापर होऊ शकतो.
डेट ऑफ बर्थ : तुमच्या जन्मदिनी तुम्हाला तुमच्या मित्रांनी विष करावं म्हणून सोशल मीडियावर तुमची जन्मतारीख महत्वाची असते. पण हीच जन्मतारीख तुमच्या फेसबुकवर उपलब्ध असेल तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते.
गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडचे फोटो : सोशल मीडियावर एक्स गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडचा फोटो असणे तुमच्या भविष्यावर परिणाम करू शकतं. त्यामुळे गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडचे फोटो फेसबुक किंवा इतर सोशल मीडियावर असतील तर आजच काढून टाका.
लोकेशन : प्रवास करताना उत्साहाने आपण आपली लोकेशन शेअर करतो. परंतु आपली लोकेशन पाहून आपल्या घरी कोणी नसल्याचे संकेत नकळपणे आपण इतरांना देत असतो. याचा गैरफायदा घेणाऱ्यांमुळे तुमच्या घराची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते.
बॉस : तुमचा बॉस तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये असणं तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतं. अशा अनेक गोष्टी झाल्या आहेत ज्यामुळे फेसबूक यूजर्सला त्यांचं मत शेअर केल्यानंतर जॉब गमवावा लागला आहे. त्यामुळे बॉसला फ्रेंडलिस्ट मध्ये ठेऊ नका.
रिलेशनशिप स्टेटस - जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नसालही फेसबुक रिलेशनशिप स्टेटस कधीही शेअर करु नका. कोणीही तुमच्यावर लक्ष ठेवून असू शकतो. तुम्ही कधी सिंगल आहात कधी रिलेशनशिपमध्ये आहात यामुळे तुमच्यासाठी ती अडचण निर्माण होउ शकते.