‘उघड्यावर शौचास बसणार नाही; प्रतिज्ञालेख सादर करा’!
By admin | Published: October 31, 2016 08:17 PM2016-10-31T20:17:32+5:302016-11-01T02:29:10+5:30
गावात सार्वजनिक ठिकाणी कुठेही उघड्यावर शौचास बसणार नाही, असे १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञालेख सादर करा; अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे, अशी नोटीस नायब तहसीलदारांनी
Next
> संतोष येलकर / ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 31 - यापुढे गावात सार्वजनिक ठिकाणी कुठेही उघड्यावर शौचास बसणार नाही, असे १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञालेख सादर करा; अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे, अशी नोटीस अकोल्याच्या नायब तहसीलदारांनी तालुक्यातील म्हातोडी येथील उघड्यावर शौचास जाणा-या १३ कुटुंबांना बजावली आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अकोला जिल्हा हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले आहे. त्यानुषंगाने शौचालय नसलेल्या कुटुंबांच्या घरी शौचालयांचे बांधकाम आणि शौचालयाचा नियमित वापर करण्याबाबत गावागावात जागृती करण्यात येत आहे. त्यामध्ये डिसेंबर २०१६ अखेरपर्यंत शौचालय न बांधणाºया शिधापत्रिकाधारक कुटुंबांचे सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत धान्य व रॉकेलचे वितरण बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी पुरवठा विभागाला दिले आहेत. त्यानुषंगाने उघड्यावर शौचास बसणाºया अकोला तालुक्यातील म्हातोडी येथील १३ कुटुंबांना नायब तहसीलदार महेंद्र आत्राम यांनी १९ आॅक्टोबर रोजी नोटीस बजावली. गावातील सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर शौचास जात असल्याने वातावरण दूषित होत आहे. त्यामुळे यापुढे गावात कुठेही सार्वजनिक ठिकाणी ‘उघड्यावर शौचास बसणार नाही,असे १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञालेख सादर करावा, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही नायब तहसीलदारांनी संबंधित कुटुंबांना बजावलेल्या नोटीसमध्ये दिला.