'बस तू चलना मत छोडना'; धनंजय मुंडेंचा शायराना अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 02:28 PM2019-06-01T14:28:14+5:302019-06-01T14:32:01+5:30

'बस तू चलना मत छोडना, लढना मत छोडना', अशा ओळी म्हणत धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांचा उत्सव वाढविण्याचा प्रयत्ना केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

'Do not stop says Dhananjay Munde | 'बस तू चलना मत छोडना'; धनंजय मुंडेंचा शायराना अंदाज

'बस तू चलना मत छोडना'; धनंजय मुंडेंचा शायराना अंदाज

Next

मुंबई - लोकसभा निवडणुकीत विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. तसेच बीडचेराष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना विजयी करण्यासाठी जिल्ह्यात अनेक सभा घेतल्या. मात्र सोनवणे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच राष्ट्रवादीला देखील मोठा पराभव पत्करावा लागला. या पराभवातून सावरण्यासाठी धनंजय मुंडे यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना साद घातली.

'बस तू चलना मत छोडना, लढना मत छोडना', अशा ओळी म्हणत धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांचा उत्सव वाढविण्याचा प्रयत्ना केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मुंडे यांच्या या शायरीचा व्हिडिओ त्यांच्या फेसबूक पेजवर देखील शेअर करण्यात आला आहे. धनंजय मुंडे आपल्या भाषणांसाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांच्या सभांसाठी लोकसभा उमेदवारांकडून मागणी करण्यात येत होती. त्यात आता त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची चिंतन बैठक सुरू आहे. या बैठकीला अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Web Title: 'Do not stop says Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.