सर्जिकल स्ट्राईकवर थांबू नका, पाकवर कब्जा करा - उद्धव ठाकरे

By admin | Published: October 11, 2016 08:37 PM2016-10-11T20:37:51+5:302016-10-11T20:48:12+5:30

मोदीजी सर्जिकल स्ट्राईक वर थांबू नका.आता अशी कारवाई करा की पाकव्याप्तच नाही तर पाकिस्तानसुद्धा जगाच्या नकाक्षावर हिंदुस्थान म्हणून ओळखला जाईल.

Do not Stop on Surgical Strike, Capture Pak - Uddhav Thackeray | सर्जिकल स्ट्राईकवर थांबू नका, पाकवर कब्जा करा - उद्धव ठाकरे

सर्जिकल स्ट्राईकवर थांबू नका, पाकवर कब्जा करा - उद्धव ठाकरे

Next

 

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - उरी दहशतदी हल्ल्यानंतर भारताने पाकमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्रईक केले. त्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाहीर अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले मोदीजी सर्जिकल स्ट्राईक वर थांबू नका.

आता अशी कारवाई करा की पाकव्याप्तच नाही तर पाकिस्तानसुद्धा जगाच्या नकाक्षावर हिंदुस्थान म्हणून ओळखला जाईल. उद्धव टाकरे यांनी सर्जिकल स्ट्रईकवरुन मोदीं स्तुती केली मात्र, त्याचवेळी त्यांनी इतर मुद्द्यावरुन त्यांच्यावर टीका केली. राज्यातील भाजपा सरकारवर यावेळी त्यांनी आपली तोफ डागली.

केजरीवाल, राहूल गांधीवर टीका -
सर्जिकल स्ट्राइकचा पुरावा मागणाऱ्यांना सीमेवर पाठवा. सर्जिकल स्ट्राइकची बातमी सैन्याच्या एका जबाबदार अधिकाऱ्याने दिली होती. त्या ब्रेकींगने आपल्या जनतेचं मन भरुन आलं. पण काही सडक्या मेंदूची लोक बडबडले. रक्ताची दलाली हा शब्द सुचतोचं कसा? राहूल गांधीना बोफोर्स मधून हा शब्द सुचला का? मोदींवर टीका करताना सैन्यांवर कसा काय अविश्वास दाखविता. भारतामध्ये समस्यांचा रावण उभा आहे. तो आजही तसाचं आहे. या समस्या सोडविणारा राम हवा आहे.

भाषणातील ठळक मुद्दे -

- विजया दशमी आणि दसऱ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा
- विषय खुप आहेत, पण 50वे वर्षे म्हटल्यावर त्या आठवणी दाटतात
-शिवसेना दसरा मेळावा - शिवसेनाप्रमुखांनी तुमच्या सारखी सोन्याची माणसं दिले
-लोकसभा निवडणूकित स्वंतत्र लढलो, आणि अश्वमेध रोखला
-हिम्मत असेल तर युती तोडा आणि समोर या
-शिवसेना दसरा मेळावा - पाठीत वार करु नका, समोरुन लढा
-पन्नास वर्षाची मेळाव्याची परंपरा यापुढेही कायम राहणारं.
-विधानसभेत थोडंस गाफील राहिलो. पाठीतून वार झाले. अजूनही तरतरी असेल तर आज युती तोडा आणि समोर या. मग आम्ही दाखवू
- मुख्यमंत्र्यांना विनंती तुम्ही तुमचा नेता निवडा
-शिवसेना दसरा मेळावा - भाजपमधील कुणीही उठतो आणि स्वबळाची भाषा करतो
-दसरा मेळावा रोखण्याची हिंमत कोणामध्ये नाही- उद्धव ठाकरे
-सर्जिकल स्ट्राईकबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जाहीर अभिनंदन -शाळेत फी भरायला पैसे नव्हते म्हणून आजोबा आणि बाळासाहेबांनी शाळा सोडली

-एकत्र निवडणुका घ्या पण मुख्यमंत्री, पंतप्रधान यांनी कुणा एका पक्षाच्या व्यासपीठावर जायला नको 
-रेसकोर्सवर वॉर म्युझियम बनवा 
-आज सोन्याची देवाण घेवाण करण्याची परंपरा आहे. मात्र शिवसेना प्रमुखांनी तुमच्या रुपात मला अमुल्य सोन दिलंय

- कोपर्डीची चिमुरडी गेली त्या चिमुरडीच्या ठिणगीने हा वणवा पेटवला. 
- या न्याय्य हक्कासोबत शिवसेना. आर्थिक निकषावर आरक्षण देता येत नसेल तर जातीवर आरक्षण द्या. पण असे आरक्षण देताना इतरांच्या हक्काला धक्का नको.

-आरक्षणाच्या मागणीबाबत शिवसेना मराठा समाजासोबत.

- न्याय हक्क लढ्यात शिवसेना सोबत आहे
-सर्जिकल स्ट्राईककरुन थांबू नका, आपल्याला सैन्यामध्ये पाकव्याप्त काश्मीरच नाही तर पाकमध्ये बारताचा झेंडा फडकावयाची ताकद आहे. मोदीजी तेवढी हिम्मत दाखवा
-समस्यांचा रावण उभा आहे. तो आजही तसाच आहे. या समस्या सोडविणार राम हवा.
-समस्यांचा रावण उभा आहे. तो आजही तसाच आहे. या समस्या सोडविणार राम हवा. सर्जिकल स्ट्राइकचा कौतुक. सर्जिकल स्ट्राईक वर थांबूनका. मोदीजी आता अशी कारवाई करा की पाकव्याप्तच नाही तर पाकिस्तानसुद्धा हिंदुस्थान म्हणून ओळखला जाईल.
-सर्जिकल स्ट्राइकची बातमी सैन्याच्या जबाबदार अधिकार्याने माहिती दिली. त्या ब्रेकींगने आपल्या जनतेच्या मनात भरत आलं. पण काही सडक्या मेंदूची लोक बडबडले. रक्ताची दलाली हा शब्द सुचतोच कसा?
-खेळाडू राजकारण वेगळे करा म्हणणारा लोकांनी आता इमरान खान , जावेद सारखे खेळाडूंचे शब्द बघावेत. तो जावेद म्हणतो इंडियाला आॅल आऊट करा.
- अमन की शांती आम्हाला नका शिकवू. त्या पाकिस्तानला शिकवा. सैन्यावर अविश्वास दाखविणार्यांवर देशद्रोहाचा खटला भरा.
- चहावाल्यांचा राज्यात डोसेवाल्यांवर छापे पडतायत. भेंडीबाजार वगैरे भागात तुमच्या इन्कमटॅक्स वगैरेचे रेड का नाही पडत
- जातीपेक्षा आर्थिक निकषावर आरक्षण द्याः
- पंतप्रधान देशाचा आणि मुख्यमत्री राज्याचे मग ते राजकीय पक्षाचा प्रचार कसे काय करतात.
- सर्जिकल स्ट्राइकचा पुरावा मागणाऱ्यांना सीमेवर पाठवा.

Web Title: Do not Stop on Surgical Strike, Capture Pak - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.