‘शाळा सुटल्यावर शिक्षकांना थांबवू नका’
By Admin | Published: July 17, 2017 02:48 AM2017-07-17T02:48:41+5:302017-07-17T02:48:41+5:30
शाळा सुटल्यावर शिक्षकांना विनाकारण जादा वेळ शाळेत थांबवू नये, असे आदेश शिक्षण निरीक्षकांनी मुख्याध्यापकांना दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शाळा सुटल्यावर शिक्षकांना विनाकारण जादा वेळ शाळेत थांबवू नये, असे आदेश शिक्षण निरीक्षकांनी मुख्याध्यापकांना दिले आहेत. यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण निरीक्षकांना धारेवर धरले होते. त्यानंतर मुंबईतील अनुदानित, विनाअनुदानित माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांना शिक्षण निरीक्षकांनी आदेशाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिक्षक परिषदेचे उत्तर मुंबईचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी यासंदर्भात उपसंचालकांना निवेदन दिले होते.