प्रलोभनांना बळी पडू नका, शरद पवारांचा मंत्र्यांना कानमंत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 05:19 AM2020-01-09T05:19:05+5:302020-01-09T07:24:46+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांची विशेष बैठक घेऊन काही मौलिक सूचना केल्या आहेत.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांची विशेष बैठक घेऊन काही मौलिक सूचना केल्या आहेत. कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नका, तसेच बदल्यांपासून चार हात दूर राहा. तीन पक्षाच्या आघाडीचे सरकार असल्यामुळे समन्वय ठेऊन काम करावे लागेल, असा कानमंत्रही दिला.
विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आटोपल्यानंतर सायंकाळी यशवंत प्रतिष्ठाण येथे राष्टÑवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांचा वर्गच खा. पवार यांनी घेतला. राष्टÑवादीच्या मंत्र्यांनी स्वत:साठी आचारसंहिता तयार केली पाहिजे. ांत्री आणि राज्यमंत्र्यांनी कसे काम केले पाहिजे, मंत्रालयात किती दिवस हजर राहायचे, मतदारसंघात कधी जायच, अशा सूचनाही देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी सांगितले.
>वडेट्टीवार यांच्याकडील खात्यात दुरुस्ती
विदर्भातील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन हे खाते द्यायचे होते, मात्र चुकून ते भूकंप पुनर्वसन असे लिहिले गेले. ती चूक दुरुस्त केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. मनासारखे खाते न मिळाल्याने वडेट्टीवार नाराज असल्याचे समजते.