मुस्लिमांचा मताधिकार काढा असं बोललोच नाही - संजय राऊतांचा यू टर्न
By admin | Published: April 14, 2015 01:10 PM2015-04-14T13:10:55+5:302015-04-14T14:01:51+5:30
मुस्लिमांचा मताधिकार काढण्याची मागणी केल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर चोहोबाजूंनी टीका सुरु झाल्यावर मंगळवारी राऊत यांनी यू टर्न घेतला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. १४ - मुस्लिमांचा मताधिकार काढण्याची मागणी केल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर चोहोबाजूंनी टीका सुरु झाल्यावर मंगळवारी राऊत यांनी यू टर्न घेतला आहे. मुस्लिमांचा मताधिकार काढा असं बोललोच नव्हतो. माध्यमांनी माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला अशी सारवासारव संजय राऊत यांनी केली आहे.
रविवारी सामनाच्या स्तंभलेखात संजय राऊत यांनी मुस्लिमांचा मताधिकार काढा अशी मागणी केली होती. यावरुन संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठली होती. काँग्रेस व अन्य विरोधकांसोबतच भाजपानेही राऊत यांच्या विधानाशी असहमती दर्शवली होती. देशभरात संजय राऊत यांच्या मागणीचा निषेध सुरु असून दिल्लीत राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी राऊत औरंगाबादमध्ये आले होते. स्थानिक पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मुस्लिम मताधिकाराच्या विधानावरुन घुमजाव केले.
मुस्लिम मतावरील अधिकार काढा तेव्हाच त्याचं राजकारण थांबेल असे मला म्हणायचे होत. मुस्लिमांचा मताधिकार काढणे हे घटनाबाह्य आहे अशी उपरतीही त्यांना झाली.