माझी प्रकृती उत्तम, अफवांवर विश्वास ठेऊ नका - शरद पवार
By admin | Published: January 26, 2016 12:14 PM2016-01-26T12:14:04+5:302016-01-26T15:05:42+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण आपण ठणठणीत असून अफवांवर विश्वास ठेऊ नका असे खुद्द पवारांनींच स्पष्ट केले.
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २६ - प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल आज सकाळपासून सोशल मीडियावर उलट-सुलट अफवा पसरत होत्या. मात्र ' माझी प्रकृती अतिशय उत्तम असून मी ठणठणीत आहे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका' असे खुद्द शरद पवार यांनीच स्पष्ट केल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
शरद पवार यांना अतिश्रमामुळे थकवा आल्याने त्यांना रविवारी दुपारी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती बरीचशी सुधारली. खुद्द पवार यांनी कालच ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रकृती ठीक असल्याचे स्पष्ट करत सर्व पाठिराख्यांचे सदिच्छांसाठी आभार मानले होते. मात्र तरीही आज सकाळपासून त्यांच्या प्रकृतीबद्दल पुन्हा उलटसुलट बातम्या ऐकू लागल्या. व्हॉट्सअॅप आणि सोशषल मीडियाच्या इतर माध्यमांतून ते वृत्त व्हायरल झाले होते. अखेर पवार यांनीच या वृत्ताचे खंडन केले असून त्यांच्या डॉक्टरांनीही त्यांची प्रकृती आता ठणठणीत असल्याचे सांगत त्यांचे सर्व रिपोर्ट्सही नॉर्मल असल्याचे स्पष्ट केले. तसेच उद्या दुपारपर्यंत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, असेही डॉक्टरांनी सांगितले.
I am well and perfectly fine. Thank for your good wishes.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 26, 2016
My health is better now. Thank you all for the concern.
— Sharad Pawar (@Pawar_Sharad) January 25, 2016