आवाज कराल मोठा तर वापरू ‘नोटा’
By Admin | Published: November 16, 2016 03:00 AM2016-11-16T03:00:57+5:302016-11-16T03:00:57+5:30
चिखली पालिका निवडणूक मतदारांचा उमेदवारांना ईशारा.
सुधीर चेके पाटील
चिखली, दि. १५- शहरात जागोजागी प्रचाररथ फिरत असून कल्पकतेने तयार केलेल्या ध्वनीफितींमधून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र एकाच प्रभागातील एका चौकात एका पाठोपाठ एक असे चार ते पाच प्रचाररथ येऊन थांबत असल्याने या ध्वनीक्षेपकाव्दारे होणार्या कर्णकर्कश गोंगाटामुळे शहरवासी पार वैतागले आहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी उमेदवारांचे हे प्रचारकार्य डोकेदुखी ठरत असल्याने मतदारांकडून ह्यनोटाह्ण चा (चलनातून बाद झालेल्या हजार-पाचशेच्या नोटा नव्हे तर मतदार यंत्नावरील ह्यनोटाह्ण ही पर्यायी सुविधा) वापर होण्याची दाट चर्चा मतदारांमध्ये ऐकवास मिळत आहे.
चिखली नगर पालिका निवडणुकीचा मतदानाचा दिवस जसा जसा जवळ येत आहे. तस-तसे राजकीय वातावरण जोरदार तापू लागले आहे. या निवडणूक रिंगणात उतरलेल्या सर्वच उमेदवारांकडून प्रचारामध्ये आघाडी घेण्यासाठीची चढाओढ लागली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांकडून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचार रथाव्दारे ध्वनिक्षेपकांचा मोठय़ा प्रमाणावर वापर होत आहे. चिखली नगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या २७ नोव्हेंबर रोजी रोजी मतदार होणार असून, शहरातील १३ प्रभागातून प्रभागातून २६ जागांसाठी तसेच नगराध्यक्षपदासाठी असे एकूण ११६ उमेदवार नशीब अजमावत आहेत