निवडणुकीत मैत्री नको युद्ध करा

By admin | Published: May 11, 2015 05:01 AM2015-05-11T05:01:21+5:302015-05-11T05:01:21+5:30

निवडणुकीच्या काळात जिंकण्यासाठी युद्धच केले पाहिजे. त्यावेळी मैत्री व सगेसोयऱ्यांची नाती आडवी आणू नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी दिला.

Do not wage war in the elections | निवडणुकीत मैत्री नको युद्ध करा

निवडणुकीत मैत्री नको युद्ध करा

Next

पुणे : राजकारणात काम करत असताना स्वपक्ष व अन्य पक्षातील कार्यकर्त्यांशी मैत्री ठेवावी. अगदी वर्षांतील ३६४ दिवस मैत्री केली तरी चालेल, पण निवडणुकीच्या काळात जिंकण्यासाठी युद्धच केले पाहिजे. त्यावेळी मैत्री व सगेसोयऱ्यांची नाती आडवी आणू नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी दिला.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या एकसष्ठीनिमित्ताने पवार यांच्या हस्ते काकडे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां.ब.मुझुमदार अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार वंदना चव्हाण, हर्षवर्धन पाटील, उल्हास पवार, बाळा नांदगावकर, निवेदिता माने आदी उपस्थित होते.
राजकीय क्षेत्रात काम करता सर्वपक्षीय मैत्री असणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. मात्र, महाराष्ट्रवगळता काही राज्यात राजकीय वर्चस्वासाठी एकमेकांच्या जीवावर उठण्याचे प्रकार होतात. परंतु, पुण्यात वेगवेगळ््या पक्षात राहून गिरीश बापट,अंकुश काकडे व शांतीलाल सुरतवाला (गॅस) यांनी मैत्री जपली. परंतु, निवडणुकीच्या काळात मैत्री ठेवून चालणार नाही. तसे असते, तर महाभारत व रामायण घडले नसते. अर्जुनालाही त्याच्या सग्यासोयऱ्यांबरोबर लढावे लागले होते. त्यामुळे युद्धावेळी समोरच्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय तुम्ही पुढे शकत नाही, अशी सल्ला पवार यांनी दिला. तसेच, पुण्यातील धोरणात्मक निर्णयावेळी मीही अंकुशचे मार्गदर्शन घेतो,अशी कबुली त्यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Do not wage war in the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.