साई शताब्दीची कामे करा!

By admin | Published: June 17, 2017 12:40 AM2017-06-17T00:40:14+5:302017-06-17T00:40:14+5:30

प्रत्यक्ष कृती कमी व प्रसिद्धी जास्त करणे, संस्थान व्यवस्थापनाला महागात पडलेआहे. केवळ शताब्दीची चर्चा सुरू असल्याच्या कारणावरून संतापलेल्या शिर्डीकरांनी

Do Sai Century Work! | साई शताब्दीची कामे करा!

साई शताब्दीची कामे करा!

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्डी : प्रत्यक्ष कृती कमी व प्रसिद्धी जास्त करणे, संस्थान व्यवस्थापनाला महागात पडलेआहे. केवळ शताब्दीची चर्चा सुरू असल्याच्या कारणावरून संतापलेल्या शिर्डीकरांनी निषेधाच्या घोषणा देत गुरुवारी रात्री संस्थान व्यवस्थापनाच्या बैठकीवर मोर्चा काढून केलेल्या कामाचा हिशोब मागितला़
साईसमाधी शताब्दी सोहळा अवघ्या ९० दिवसांवर आला असला तरी घोषणाबाजी वगळता नजरेत भरणारी कोणतीही कामे झालेली नाहीत. या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष कैलास कोते, डॉ़ एकनाथ गोंदकर, कमलाकर कोते, अभय शेळके, विजय कोते, निलेश कोते, बाबासाहेब कोते आदींच्या नेतृत्वाखाली शिर्डीकरांनी निषेधाच्या घोषणा देत थेट संस्थान व्यवस्थापनाच्या बैठकीवर धडक मोर्चा काढला़ व्यवस्थापनाला त्याची कुणकुण लागल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़
संतप्त आंदोलकांनी संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांच्यासह विश्वस्तांना जाब विचारला़ भक्तांचे व शहराचे प्रश्न सोडवता येत नसतील तर विश्वस्तांना शहरबंदी करू, गावबंद, रास्ता रोको सारखी आंदोलन करू, असा इशारा आंदोलकांनी दिला. शहराचा विकास झाल्याशिवाय एक पैसाही बाहेर देऊ नये. भाविकांसाठी शिवसृष्टी विनामूल्य ठेवावी, ग्रामस्थांना विश्वासात घ्यावे, अशी तंबीच देण्यात आली़ उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, नगराध्यक्षा योगिता शेळके, कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल आदी बैठकीला उपस्थित होते़
शिर्डी रुग्णालयात पुरेशा रुग्णवाहिका नसताना संस्थान राज्यभरात ५०० रुग्णवाहिका वाटते. डॉक्टर व औषधांचा तुटवडा आहे़शिर्डीत देणगीतून सामान गोळा करतात व राज्यात अन्यत्र मुक्तहस्ते देणगी वाटतात, असा आंदोलकांनी आक्षेप घेतला. महाविद्यालय सुरू होवू शकले नाही. संस्थानने सीसीटीव्ही बसविलेले नाहीत. दर्शनबारी, पाणी योजना, स्वच्छतागृहे, रस्त्यांची कामे, दुभाजक व चौकांची सजावट, नगर-मनमाड मार्गावरील दोन्ही बाजूंनी स्वागत कमानी, साईगार्डन, लेसर-शो अशी कोणतीही कामे झाली नसल्याकडे नागरिकांनी लक्ष वेधले़ शिर्डीकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची ग्वाही हावरे यांनी दिली़

Web Title: Do Sai Century Work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.