लग्नाआधी सेक्स करण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?

By Admin | Published: March 19, 2017 10:31 PM2017-03-19T22:31:23+5:302017-03-19T23:13:42+5:30

लग्नाआधी सेक्स केल्यास अनेक फायदे तुम्हाला मिळतात.

Do you know the benefits of sex before marriage? | लग्नाआधी सेक्स करण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?

लग्नाआधी सेक्स करण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - भारतात सेक्स हा शब्द काहीसा वाईट पद्धतीनं घेतला जातो. अनेकदा लोक सेक्स या विषयावर बोलणं टाळतात. अनेक जणांचे लग्नाआधी एखाद्याशी शारीरिक संबंध येतात, त्यामुळे ब-याचदा सेक्स केल्यानंतर मनावर एक प्रकारचं दडपण येतं. मात्र एका संशोधनानुसार सेक्स केल्यानं तुमचं आरोग्य उत्तम राहते. सेक्समुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्याप्रमाणेच शरीरातील कोलेस्ट्रॉल सुधारण्यासही एक प्रकारे मदत मिळते. सेक्समुळे ताणतणाव कमी होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही धूसर असते. दररोज सेक्स करणारी माणसं ही केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिकदृष्ट्याही फीट राहतात. ब-याचदा लग्नाआधी सेक्स करणं अनेकांना चुकीचं वाटतं. मात्र लग्नाआधी सेक्स केल्यास अनेक फायदे तुम्हाला मिळतात.
लग्नाआधी सेक्स केल्याचे काही फायदे
- जर तुमची गर्लफ्रेंड असेल आणि ती तुमच्याप्रति प्रामाणिक असल्यास सेक्स तुमच्या नात्याला आणखी घट्ट करतो. त्यामुळे सेक्सचा दोघांनाही फायदा होतो.
- ब-याचदा अनेकांना वाटतं लग्नानंतरच सेक्स करणं योग्य आहे. मात्र जर तुम्ही लग्नाआधी सेक्स केला, तर तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे जोडीदारासोबत सेक्स करू शकता. त्यामुळे लग्नानंतरही तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे सेक्स समजतो. तसेच जोडीदारही आनंदी राहते.
- सेक्स केल्यानंतर व्यक्ती मानसिक आणि शारीरिक दोन्ही गरजा पूर्ण करतो. त्यामुळे धकाधकीच्या जीवनात सेक्स केल्यास आनंदाची तृप्ती मिळते.
- लग्नाआधी सेक्स केल्यानं व्यक्तीच्या मनाला शांतीची अनुभूती येते आणि त्याला मोठ्या प्रमाणात राग येत नाही. तसेच तो स्वतःच्या मित्रांसोबतही चांगल्या प्रकारे वर्तन करतो.
- लग्नाआधी सेक्स केल्यानं एक प्रकारचं समाधान प्राप्त होतं. त्यामुळे व्यक्ती आजूबाजूला असलेल्या कोणालाही पाहून उत्तेजित होत नाही. तो खूपचं समाधान व्यक्त करतो.

Web Title: Do you know the benefits of sex before marriage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.